‘कोविड योध्दा’ नरेंद्र फिरोदिया यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 8, 2020

‘कोविड योध्दा’ नरेंद्र फिरोदिया यांचा सन्मान

 ‘कोविड योध्दा’ नरेंद्र फिरोदिया यांचा सन्मान

नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोना काळात विविध माध्यमातून समाजाला भरीव मदत करण्यासाठी सातत्यपूर्ण योगदान देणारे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांना जिल्हा पोलिस दलाने कोविड योध्दा म्हणून सन्मानित केले आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी हे सन्मानपत्र फिरोदिया यांना दिले. नगरच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा वर्तुळात भरीव योगदान देण्याचे कार्य नरेंद्र फिरोदिया करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून व या प्रक्रियेत सर्वसामान्य नगरकरांना समावून घेणारी आय लव्ह नगर चळवळ खूपच फलदायी ठरत आहे. आताच्या कोविड काळात फिरोदिया यांनी पोलिस दल, वैद्यकीय क्षेत्र तसेच समाजातील गरजूंना भरभरुन मदत देणे चालूच ठेवले आहे. विविध उपक्रमांतून ते कोविडविरुध्दच्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्यामुळेच त्यांचा कोविड योध्दा म्हणून उचित सन्मान करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment