रावसाहेब पटवर्धन पतसंस्था तत्कालीन अध्यक्ष-उपाध्यक्ष संचालक, उपनिबंधकासह 29 जणांवर गुन्हे दाखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 8, 2020

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था तत्कालीन अध्यक्ष-उपाध्यक्ष संचालक, उपनिबंधकासह 29 जणांवर गुन्हे दाखल!

 रावसाहेब पटवर्धन पतसंस्था तत्कालीन अध्यक्ष-उपाध्यक्ष  संचालक, उपनिबंधकासह 29 जणांवर गुन्हे दाखल!

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी येथील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकमंडळ यांच्यासह थेट जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधातच तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी इस्माईल गुलाब शेख (वय 71, रा. तारकपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. जिल्ह्यमधील  एके काळाची अग्रगण्य असलेली आणि आता आर्थिक संकटात सापडलेली रावसाहेब पटवर्धन पतसंस्था तथा  प्रवरा नागरी  पतसंस्थेच्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळवण्यासाठी आतापर्यंत बरेच आंदोलने केली लेखी व तोंडी पाठपुरावा केला आहे. परंतु काही राजकीय पाठबळ असलेल्या लोकाच्या आशीर्वादामुळे आता पर्यंत कोणत्याही संचालकांवर ठोस कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही.तसेच जिल्हा उपनिबंधक आणि संचालक ह्यांचे असलेले एकमेकात असलेले ‘सहकार धोरण’ सुद्धा त्यास कारणीभूत  ठरले होते, पण आता गुन्हा दाखल झाल्यामुळे ठेवी व सभासदांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ठेवीदार संघटनेने आतापर्यंत संचालक पदावर नियुक्त राहिलेले सर्व 26 संचालक आणि विविध शाखेत कार्यरत राहिलेले व्यवस्थापक ह्या सर्वांवर (महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा 1999) चझखऊ अंतर्गत त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती. त्वरित  कारवाई न झाल्यास जिल्हा उपनिबंधक ह्यांना सुद्धा सहआरोपी करण्यात येईल अशा आशयाचे पत्र जिल्हा उपनिबंधक ह्यांना ठेवीदार कृती समितीने दिले होतेे.रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत लघु मध्यम व दीर्घ मुदतीत पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवल्यास व्याजासह चांगला परतावा मिळेल असे प्रलोभन ठेवीदारांना दाखविण्यात आले होते. या पतसंस्थेत इस्माईल शेख यांच्यासह अनेक ठेवीदारांनी पैसे गुंतविले. मात्र परताव्याची मुदत संपूनही बहुतांशी जणांना पैसे न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली. या आर्थिक फसवणुकीबाबत शेख यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था तथा प्रवरा नागरी सह पतसंस्था यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. यावर न्यायालयाने फिर्यादीच्या मागणीनुसार गुन्हा दाखल करून घेत हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याचे आदेश दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारी तसेच याच पतसंस्थेचे नाव प्रवरा पतसंस्था असे बदलल्यानंतर या संस्थेवर कार्यरत असलेले संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा उपनिबंधक हे सहकारी संस्थेचे अधिकारी आहेत. त्यांनी मात्र आरोपींना वाचविण्यासाठी त्यांच्यावर कारवाई न करता चुकीचे कागदपत्र तयार केले आहेत. त्यांनाही सहआरोपी करावे, अशी फिर्यादीच्यावतीने मागणी करण्यात आली होती. आर्थिक अपहार प्रकरणात योग्य ती कार्यवाही न केल्याने थेट जिल्हा उपनिबंधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्यामुळे गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेशन शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment