नायक भरत कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 10, 2020

नायक भरत कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 नायक भरत कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कदम कुटुंबासाठी एक लाखांची मदत
जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.उदय शेळके यांनी भरत कदम यांच्या कुटुंबासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंचायत समि जणतीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांनी जवान भरत कदम यांच्या कुटुंबासाठी भविष्यात लागणारा वैद्यकीय खर्च विनामुल्य करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांनी ‘जवान भरत कदम अमर रहे’ अश्या घोषणा देत भरत कदम यांना अखेरचा निरोप दिला. जवान भरत कदम यांना आपल्या मुलीचा पहिलाच वाढदिवस साजरा न करता आल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

सामाजिक अंतर ठेऊन अंत्यविधी
कारोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नायक भरत कदम यांचा अंत्यविधी सामाजिक अंतर ठेऊन, उपस्थित सर्वांनी मास्क व सनीटायझर वापरून अंत्यविधी पार पाडण्यात आला. यावेळी अनेक नागरिक व ग्रामस्थ शोकाकुल होते.

माझ्या तालुक्यातील जवान देशाची सेवा करत असतांना देशसेवेसाठी कामी आला ही तालुक्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,पद्मभूषण डॉ.आण्णा हजारे यांचा आदर्श घेवून तालुक्यातील अनेक तरुण संरक्षण क्षेत्रात देशसेवा करत आहे,त्यांना शासकीय पातळीवर जी काय मदत लागेल ती लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव करण्यांस तयार आहे.
-निलेश लंके (आमदार)

भारत भूमीचा तारा निखळला
देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झालेल्या नायक भरत कदम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवा केली आहे.त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला येण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली असून नायक भरत कदम यांच्या माध्यमातून भारत भूमीचा एक भरत तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार ज्योती देवरे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
-  ज्योती देवरे, तहसीलदार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आसाम येथील तेजपूर येथे कर्तव्य बजावत असताना ट्रेनिंग दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन चे नायक भरत लक्ष्मण कदम यांच्यावर आज रविवारी सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठा सख्यंने जनसमुदाय उपस्थित होता.
शुक्रवारी आसाम येथील तेजपुर येथे सकाळी मॉर्निंग बिपिटी ट्रेनिंग सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्याने नायक भरत कदम यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव शासकीय विमानाने आसाम वरून दिल्ली व दिल्ली वरून पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुण्यावरून रुग्णवाहिका मधून त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी पिंपरी जलसेन येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात आज सकाळी 11 वाजता पिंपरी जलसेन येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी भारत माता की जय,शहीद जवान अमर रहे अशा देश घोषनांनी परीसर शोकाकूल सागरात बुडून गेला होता.
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे,पारनेर चे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी यावेळी प्रशासकीय चोख बंदोबस्त ठेवला.यावेळी पारनेर चे आमदार निलेश लंके,जिल्हा परिषद माजी सदस्य अ‍ॅड आझाद ठुबे,पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे,यांच्यासह विविध गावातील आजी,माजी सरपंच,सदस्य,सेवा संस्थेचे संचालक व पारनेर तालुक्यातून अनेक नागरिक मोठ्या संख्येने अंत्यविधी साठी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment