संपादकीय : कट्टर हिंदुत्ववादी, शिवसैनिक ‘भैय्या’ काळाच्या पडद्याआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 5, 2020

संपादकीय : कट्टर हिंदुत्ववादी, शिवसैनिक ‘भैय्या’ काळाच्या पडद्याआड.

संपादकीय :कट्टर हिंदुत्ववादी, शिवसैनिक ‘भैय्या’ काळाच्या पडद्याआड.


हिंदुत्वाची कास धरलेला, सर्वसामान्यांच्या हाकेला त्वरित प्रतिसाद देणारा, शिवसेनेचा ढाण्या वाघ, मोबाईल नेता, खराखूरा शिवसैनिक नगरकरांच्या हृदयावर सलग पंचवीस वर्षे साम्राज्य करणारा अनिल राठोड भैय्या आज पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने नगर जिल्ह्यातील शिवसैनिक नव्हे, तर विविध पक्षांच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. सहकार व साखर सम्राटाच्या या जिल्ह्यात राठोड यांनी शिवसेना वाढीसाठी अविरत परिश्रम घेतले .त्यांच्या परिश्रमाची दखल घेत सलग 5 वेळा नगरकरांनी त्यांना विधानसभेत पाठविले. सहाव्या वेळेस त्यांचा झालेला पराभव त्यांना अस्वस्थ करून गेला. पराभवाची सल त्यांच्या मनातून जाऊ शकली नाही. स्वतःचा झालेला पराभव, राज्यात सत्तेची बदललेली समीकरणे ते खरेखुरे हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांना आवडली नाहीत. आज राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक क्षणी श्रीरामांचा भक्त आपल्यातून निघून गेला आहे. अनेक वर्षांपासून श्रीरामांचं भव्य मंदिर श्रीराम जन्मभूमीवर निर्माण व्हावं हे भैय्यासारख्या खर्‍याखुर्‍या शिवसैनिकांचं स्वप्न होतं हे स्वप्न आज पूर्ण होत असताना, ते भैय्यांना पाहता आलं नाही. नियतीने त्यांना ही शिक्षा का द्यावी? श्रीराम जन्मभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करीत असताना आनंद उत्सव साजरा करण्याच्या आजच्या क्षणी भैय्या यांच्या निधनाचे दुःख शिवसैनिकांना अस्वस्थ करून गेले आहे. नगरकरांच्या डोळ्यातील अश्रू भैय्यांच्या लोकप्रियतेचे साक्ष देत आहेत.
राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ला पहिली निवडणूक लढविली 1990 ते 2014 सलग 5 वेळेस ते विजयी झाले. या काळात सर्वसामान्य नागरिकांचा किरकोळ कोणताही प्रश्न असो, भैय्यांनी कधी फोन उचलला नाही किंवा ते उपलब्ध झाले नाहीत, असं कधीच घडलं नाही. 9422221608 हा त्यांचा मोबाईल नंबर कधीच स्वीचऑफ झाला नाही. शिवसेना भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडं महसूल राज्यमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांचे जवळच्या अनेक सहकार्‍यांशी मतभेद निर्माण झाले. ते सहकारी त्यांना सोडून गेले, पण त्यांनी कधीच कोणाची पर्वा केली नाही .कारण सर्वसामान्य नागरिक सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला .ते आमदार म्हणून कधीच वावरले नाहीत. त्यांना कोणी आमदार म्हणून पुकारलं नाही, तर त्यांना भैया म्हणून ओळखलं गेल. मंत्री झाले पण नामदार झाले नाहीत. ते शेवटपर्यंत भैयाच राहिले. व भैय्या म्हणूनच काळाच्या पडद्याआड गेले. सातव्या वेळी त्यांचा पराभव झाला तेव्हा त्यांनी जवळच्या सहकार्‍यांनी दगा दिला हा त्यांचा आक्षेप होता, पण भैय्या यांचा जो पराभव झाला, तो कोणीच केला नाही तर स्वतः त्यांनीच करून घेतला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 
2013 ला भाजप-शिवसेना युती नसल्यामुळे भाजप-शिवसेना उमेदवारांच्या मतविभागणीचा फटका भैय्यांना बसला. अतिशय कमी मताधिक्याने  त्यांना पभराव पत्कारावा लागला. यशाला अनेक पैलू असतात, पण पराभवाचं खापर कोणावर फोडून काही उपयोग नाही हे त्यांना ओळखता आलं नाही. पण त्यांची जनतेशी असणारी नाळ कधीच तुटली नाही. पराभव झाला असला तरी ते विविध कार्यक्रमात सतत दिसत राहिले. पराभवानी ते खचले नाहीत सतत कार्यमग्न राहिले. व म्हणूनच भैय्या यांचं निधन हा नगरकरांना मोठा धक्का आहे. 
अनिल राठोड यांना आठ दिवसापूर्वी श्वसनाचा त्रास झालेला होता ज्यामुळे त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, तपासणीदरम्यान त्यांना न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आले होते. चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अनिल राठोड हे न्युमोनियातून बरे होत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना बरे वाटत होते, आणि त्यांनी हलका आहारही घ्यायला सुरुवात केली होती. मात्र बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड हे नगरमध्ये सुरुवातीला हिंदुत्ववादी संघटनांसाठी काम करत होते, हिंदुत्ववादी विचारांची कास त्यांनी सुरुवातीपासूनच धरली होती. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावून राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते सलग पंचवीस वर्ष या शहराचे ते आमदार होते. शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर त्यांना अन्न अन्नपुरवठा मंत्रीपद मिळालं होतं. लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार्‍या अनिल राठोड यांनी कोरोना काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अन्नछत्र सुरु केले होते. या काळात गरजूंना शक्य होईल तशी सगळी मदत त्यांनी उपलब्ध करून दिली होती. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली हा मोठा आघात शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणार्‍या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे. 
युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले. नगर जिल्ह्यातून 25 वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता, कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणार्‍या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील कट्टर शिवसैनिक नगरकरांनी गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांतता लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.


No comments:

Post a Comment