यूजीसीच्या नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम ः मयुर पटारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 14, 2020

यूजीसीच्या नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम ः मयुर पटारे

यूजीसीच्या नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम ः मयुर पटारे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीरामपूर ः यूजीसीच्या नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असल्याने विद्यार्थ्यांचा सभ्रम दूर करावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे यांनी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांना दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने राज्याच्या विभागाला पत्र पाठवुन यू.जी.सी च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे अंतिम परीक्षा घेण्याची सूचना केलेली आहे. महाराष्ट्रात करोना महामारीचा रोगाचा  प्रभाव वाढ होत आसल्याने परीक्षा घेणे योग्य वाटत नाही. तसेच विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणे बरोबर नाही. आजचा विद्यार्थी हा आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे. त्यांना सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना सरासरी गुण देण्याची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची भूमिका आहे.  मात्र युजीसीच्या नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  विद्यार्थ्यांचा हा संभ्रम राज्य सरकार लवरकच दूर करेल, असा विश्वास विद्यार्थी प्रतिनिधि ह्या नात्याने मला आहे. यूजीसीच्या पहिल्या नियमावलीप्रमाणे राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांचे हित आणि भविष्यातील कारकीर्द लक्षात घेऊन नियमावलीबाबत कोणताही संभ्रम होणार नाही याची आपण काळजी घ्यावी असे नावेदनात नमुद करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment