‘लॉकडाऊन काळातील घरपट्टी-पाणीपट्टी माफ करावी’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 14, 2020

‘लॉकडाऊन काळातील घरपट्टी-पाणीपट्टी माफ करावी’

‘लॉकडाऊन काळातील घरपट्टी-पाणीपट्टी माफ करावी’
नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः  राहुरी नगरपालिका प्रशासनाने राहुरी शहरामधील लॉकडाऊन कालवाधीमधील भाडे माफ व संकलित पट्टी व पाणी पट्टी माफ करणे यावी, अशी मागणी शहरातील व्यवसायिकांनी केली आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशा सह राज्या मध्ये संचारबंदी लागु करण्यात आल्या मुळे राहुरी शहरामधील सर्व व्यवसायकांचे संचारबंदी मुळे 66 दिवस पुर्णपणे व्यवसाय बंद होते त्या मुळे व्यापा - यांचे मोठया प्रमाणे मध्ये नुकसान झाली असुन त्या मध्ये कामगारांचे पगार लाईट बिल बँकांचे व्याज यांचा प्रचंड प्रमाणात भुरदंड सहन करावा लागला आहे. त्या मुळे राहुरी शहरामधील नगरपालिकेच्या गाळे धारकांना भाडे माफ करावे असे पत्र राहुरी शहरामधील व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रकाश पारख , विलास तरवडे देवेंद्र लांबे अनिल कासार, सुर्यकांत भुजाडी नवनीत शेठ दरक इ.व्याप - यांनी पत्र देण्यात आले असुन व चर्चा करण्यात आली तरी राहुरी नगरपालिका या पत्राचा सहानुभुतिपुर्वक विचार करून निर्णय घेण्यात यावा. असे राहुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख हयांनी सांगितले. तसेच मा.तहसिलदार साहेब राहुरी यांना हि अशाच प्रकारे विनंती करून सर्व संस्थानी विचार करावा तसेच तहसिलादर व चिफ ऑफिसर हयांनी राज्य शासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच राहुरी तालुकयाचे नामदार श्री . प्राजक्त तनपुरे हयाचे कडे नागरीविकास खाते असल्यामुळे त्यांना व्यापारी संघटना भेटणार आहे.

No comments:

Post a Comment