चुंभळेश्वर डोंगरावर वृक्षसंवर्धनाचा संकल्प; 1001 झाडांची केली लागवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 14, 2020

चुंभळेश्वर डोंगरावर वृक्षसंवर्धनाचा संकल्प; 1001 झाडांची केली लागवड

चुंभळेश्वर डोंगरावर वृक्षसंवर्धनाचा संकल्प; 1001 झाडांची केली लागवड
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः नगर- पुणे महामार्गावरील आदर्श गाव नारायणगव्हाण येथे लोकसहभाग व श्रमदानातुन पंचक्रोशितील निसर्गप्रेमी, शिवभक्तांनी पावसाळ्याचे अवचित्य साधत निसर्गाच रक्षण करण्याची प्रेरणा नव्या पिढिसमोर ठेवुन चुंभळेश्वरावर 1001 खड्डे खोदुन रविवारी सकाळी 10.00 वा.वृक्षारोपणाचा शुभारंभ ह.भ.प.आप्पा महाराज पवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वृक्षारोपणासाठी सचिन जाधव यांनी टँकरची सुविधा उपलब्ध केली, सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, परिवर्तन फाऊंडेशनचे सुहास शेळके,सचिन भालेकर यांनी झाडांची रोपे भेट दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच सुरेश बोर्हुडे, चेअरमन बाळासाहेब चव्हाण, सहादु शेळके, अर्जुन वाल्हेकर, काशिनाथ नवले, शंकर चव्हाण, आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर वृक्षलागवडीसाडी देवस्थानचे सुदाम नवले, डॉ.सचिन खोले, मेजर ज्ञानदेव कांडेकर, सतिष गाडीलकर नतिन कोहकडे, चैतन्य खोले, यांनी मोठे कष्ट घेतले व वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धनाचा संकल्प यावेळी सर्वांनी एकजुटीने केला. सचिन शेळके यांनी सर्वांचे आभार मानत गावातील स्मशानभुमी, गायरान क्षेत्रासह गावात जागा उपलब्ध होतील अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबवुन वृक्ष चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले.
       तुकोबारायांच्या वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरी वनचरेयाअभंगाचा भावार्थ समोर ठेवुन तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगराप्रमाणे महादेवाचा चुंभळेश्वर डोंगर निसर्गरम्य पर्यटन स्थळ बनवुन गावाची देशात ओळख निर्माण करणार.
- सचिन शेळके, वृक्षसंवर्धन वनसंरक्षक समिती प्रमुख, चुंभळेश्वरल्प; 1001 झाडांची केली लागवड

No comments:

Post a Comment