जय भगवान महासंघाची पाथर्डी तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 6, 2020

जय भगवान महासंघाची पाथर्डी तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर

जय भगवान महासंघाची पाथर्डी तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर 

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पाथर्डी ः जय भगवान महासंघाचे अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व पाथर्डी तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे.जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी निवडीचे पत्र दिले आहे. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रमेश सानप यावेळी उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब वाघ यांची निवड करण्यात आली असुन पाथर्डी तालुका अध्यक्ष प्रल्हाद कीर्तने युवा तालुका अध्यक्ष राहुल फुंदे, युवा तालुका उपाध्यक्ष विजय फुंदे, शेवगाव तालुका अध्यक्ष दराडे अंकुश व राजेंद्र केदार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 
यावेळी प्रल्हाद कीर्तने म्हणाले की माझी निवड केल्याबद्दल जय भगवान महासंघाचे संस्थापक बाळासाहेब सानप यांचे मी आभार मानतो. यापुढे जय भगवान महासंघाची प्रत्येक गावात स्थापना करणार आहे, व सतत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम मी करेन व तालुक्यामध्ये संघटनेचे काम अधिक मजबूत करणार आहे . यावेळी संघटक लहू दराडे,आजिनाथ बटुळे,हरीश बटुळे,किरण कराड ,अंकुश दराडे, अंबादास बटुळे , दिलीप पवळे, कमरुद्दीन तांबोळी, नितिन अंदुरे, मालेवाडीचे माजी सरपंच वसंत खेडकर मालेवाडीचे सरपंच शहादेव किर्तने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
यावेळी बाळासाहेब सानप म्हणाले की, ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करत नसून वंचित बहुजनासाठी काम करते. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी तळागाळातील  वंचित गोरगरीब जनतेसाठी काम करावे व संघटनेचे काम वाढवावे व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment