येत्या हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार ः नागवडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 6, 2020

येत्या हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार ः नागवडे

     येत्या हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार ः नागवडेनगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  मागील वर्षी उसाच्या कमतरतेमुळे  ’नागवडे’ साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद होता. आगामी  हंगामासाठी  कार्यक्षेत्रात  मुबलक ऊसाची उपलब्धता आहे. कारखान्याची यंत्रसामग्री देखभाल ,दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत.  ’नागवडे’ कारखान्याने या हंगामासाठी 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती ’नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते रोलरचे  विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना नागवडे म्हणाले की,  राज्य साखर संघाचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांचे विचार आणि संस्कार घेऊन ’नागवडे’ कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. नागवडे कारखान्याने सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन नेहमी इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव दिला आहे.  शेतकर्‍यांची देणी कधीच थकू दिली नाहीत. एफआरपीप्रमाणे ऊसदर देऊनव काहीवेळा ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा अधिक दर दिला आहे.स्व.बापूंचा वारसा चालविण्याचे काम व्यवस्थापन यशस्वीपणे करीत आहे..बापूंच्या स्वप्नातील  26 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाची यशस्वी चाचणी झाली आहे.या हंगामापासून सहवीज निर्मिती प्रकल्प व काही तांत्रिक अडचणीमुळे बंद असलेला आसवनी प्रकल्पाचे विस्तार वआधुनिकीकरण करून नियमित कार्यान्वीत होणार आहे.व उत्पादकांना चांगला दर देण्याचा प्रयत्न राहील.यावेळी कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर, श्रीनिवास घाडगे, पंचायत समितीचे माजी सभापती अरुणराव पाचपुते, योगेश भोईटे, विलासराव काकडे, प्रा. सुनील माने, युवराज चितळकर, शरद जगताप, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कारखान्याचे मुख्य अभियंता रामचंद्र मखरे,सहवीज निर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापक  संजय दिघे, स्थापत्य अभियंता संपत कुलांगे आदिसह अधिकारी, कामगार व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले तर रामचंद्र मखरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment