कोरोनाला रोखण्यासाठी राहुरीत विविध उपाय योजना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 6, 2020

कोरोनाला रोखण्यासाठी राहुरीत विविध उपाय योजना

कोरोनाला रोखण्यासाठी राहुरीत विविध उपाय योजना 

नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः कोरोना विषाणुचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी राहुरी शहरात विविध उपाय योजना करण्यात येत आहे. गेल्या 2 ते 3 दिवसा पासून तहसीलदार , पोलीस निरिक्षक ,मुख्याधिकारी यांच्या विभागा तर्फे शहरात संयुक्तीक कार्यवाही करण्यात येत आहे.शहरात मास्क न बांधलेले नागरीक, रस्त्यावर थुंकणारे नागरीक तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या नागरीक व व्यापारी वर्गवार भाजी विक्रेते यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. या मध्ये काल अखेर 1 लाख 32 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.या कार्यवाही मध्ये तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनातील कर्मचा-यांनी भाग घेतला. हे पथक शहरातील विविध भाग, बाजार पेठा येथे या मोहिमेत पहिल्या दिवशी  रु. 15,000/- मात्र दंडात्मक महसूल जमा करण्यात आला.क्यूत्या प्रमाणे नगरपरिषद कर्मचा-यांची थर्मल स्कॅनर व पल्स अ‍ॅक्सीमिटर यंत्राद्वारे तपासणी केली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ श्रीनिवास कुर्हे ह्यांनी दिली.

No comments:

Post a Comment