नेवासाफाटा येथील विद्युत पुरवठा स्वतंत्र करा ः साळवे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 9, 2020

नेवासाफाटा येथील विद्युत पुरवठा स्वतंत्र करा ः साळवे


नेवासाफाटा येथील विद्युत पुरवठा स्वतंत्र करा ः साळवे
नगरी दवंडी /प्रिंतनिधी
नेवासा ः नेवासा फाटा येथे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आसून त्यामुळे व्यावसायिकांना मोठा अर्थिक भुर्दंड विनाकारण सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेवासा फाटा येथील व्यायसायिकांसह घरगुती विद्युत पुरवठा स्वतंञ करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडू असा इशारा इंदिरा काँग्रेस पक्षाचे (एस.सी) उपजिल्हाध्यक्ष प्रविण साळवे यांनी नेवासा ग्रामिण विभागाच्या महाविज वितरण कंपणीच्या अधिकार्‍यांना लेखी निवेदनात दिला.
या निवेदनात साळवे यांनी म्हटले आहे की,नेवासा फाटा येथे व्यावसायिकांची संख्या मोठी आहे महाविज वितरण कंपणी येथील व्यावसायिकांना व्यावसायिक दराने विद्युत पुरवठा करते माञ सुरेशनगर, हंडिनिमगांव, जुने मुकिंदपूर व मक्तापूर येथे तांञिक बिघाड झाल्यास नेवासा फाटा येथील विद्युत पुरवठा खंडीत केला जातो.त्यामुळे विजेवर अवलंबून आसणार्‍या व्यावसायिकांना मोठा अर्थिक तोटा सहन करण्याची वेळ येते त्यामुळे नेवासा फाटा येथील व्यावसायिकांचे हित लक्षात घेवून महाविज वितरण कंपणीने नेवासा फाटा परिसरातील विद्युत पुरवठा 15 दिवसांच्या आत स्वतंञ करावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी इंदिरा काँग्रेसचे उपजिल्हा प्रमुख प्रविण साळवे यांनी निवेदनात दिला आहे.

No comments:

Post a Comment