शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी शरदभाऊ सुद्रिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 9, 2020

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी शरदभाऊ सुद्रिक


शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी शरदभाऊ सुद्रिक
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत  ः  येथील  शरदभाऊ सुद्रिक यांची अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक अहमदनगरच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिक्षक कॉलनी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. 120 वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेच्या चेअरमन पदावर वर्णी लागल्यानंतर कर्जत येथील शिक्षक कॉलनीत आनंदोत्सव साजरा करत  शरदभाऊ सुद्रिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धोंडीबा गांगर्डे, सोनबा जगताप, आबा कोरडे, भानुदास लांडघुले, आबासाहेब जोगदंड, संजय टकले, अशोकराव खराडे, अशोकराव नेवसे, शहाजी घुमरे, सुनील बेलकर, बाळासाहेब गांगर्डे, विनायक सागडे, आप्पासाहेब हाके, प्रविण जगताप, पिंटू पवार, भाऊसाहेब तोरडमल आदी सह नागरिक उपस्थित होते.
यावेळी चेअरमन शरदभाऊ सुद्रिक यांनी आपण सभासदाच्या हिताचे निर्णय घेऊ  यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन बँकेचे कामकाज करू आपल्या काळात बँकेचा नावलौकिक वाढेल असे काम करू असे म्हणत कॉलनीतील सर्वाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment