कोरोना पार्श्वभूमीवर जामखेडात वाहनांवर कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 9, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर जामखेडात वाहनांवर कारवाई

कोरोना पार्श्वभूमीवर जामखेडात वाहनांवर कारवाई
नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागली आसल्याने अखेर महसूल विभागाने रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे सह महसूलच्या महीला कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून डब्बल सीट दुचाकींवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
           
जामखेड तालुक्यात सध्या लोणी येथे 2, जवळके येथे 2, मोहरी 1 व जायभायवाडी येथे 1 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या जामखेडला पुन्हा कोरोनानी शिरकाव केला असून, नागरिकांचा निष्काळजीपणा दिसुन येत आहे.  मुंबई-पुण्याहून येणार्‍या बरोबरच बाहेरगावाहून शहरात येणार्‍या नागरिकांनी कोरोनाचा वानवळा आणला आहे. कोरोनाने ग्रामीण भाग बाधित केला आहे. जामखेडच्या प्रशासनाने गेली तीन महिण्यांपासून डोळ्यात तेल घालून काम केले, मात्र आता हात टेकले आहेत. शहरातील जयहिंद चौक, खर्डा चौक, नगर रोड या परिसरात रोज नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्यासह तलाठी, कोतवाल, जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी ,नगरपरिषदेचे कर्मचारी, व महसूल विभागाच्या महीला कर्मचार्यांनी सकाळपासून कंबर कसली.  तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन अनेक नागरीकांच्या वाहनांवर कारवाई केली. तहसीलदार स्वतः रस्त्यावर उतरल्याने नागरीकांनी देखील त्यांचे कैतुक केले. तसेच कर्मचार्‍यांकडून रस्त्यावर थांबून गप्पा मारणार्‍यांना लाठीचा प्रसाद मिळाला. रस्त्यावर येणार्‍या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली

No comments:

Post a Comment