कोरोना योद्धा इमरान बागवान यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 10, 2020

कोरोना योद्धा इमरान बागवान यांचा सन्मान

कोरोना योद्धा इमरान बागवान यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नगर ः मानवाधिकार संरक्षण समिती (नवीदिल्ली) च्या अहमदनगर शाखेच्यावतीने आपल्या विभागात समाजासाठी जीवाची पर्वा न करता मानवतेच्या सुरक्षतेसाठी आहोरात्र केलेल्या समाजकार्याबद्दल समितीच्यावतीने कोव्हिड योद्धा म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो. यामध्ये अहमदनगर शहरातील धरतीचौक येथील इमरान बागवान फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष इमरान बागवान यांना मानवाधिकारी संरक्षण समितीचे शहर सचिव कौसरभाई शेख यांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाच्या काळात इमरान बागवान यांनी फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून अनेक गोर-गरीब, गरजूंना व प्रवासी मजुरांना खाद्या पदार्थ, अन्न-धान्य व रहिवासी भागात भाजीपालाचे वाटप केले होते. तसेच कोरोनाबाबत जनजागृती करुन समुपोदेशन केले. अशा विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना मानवाधिकार समितीच्यावतीने ‘कोरोना योद्धा’ म्हणून हा बहुमान बहाल करण्यात आला आहे. इमरान बागवान यांचा झालेल्या गौरवाबद्दल जहिर कुरेशी, प्रितेश सूर्यवंशी, अय्युब खान, रोहित राठोड, इरफान शेख, आदिंसह अनेक संस्था व समाजातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment