पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गहू किंवा डाळ द्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 10, 2020

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गहू किंवा डाळ द्या

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गहू किंवा डाळ द्यानगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी  ः  शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांना तांदूळऐवजी गहू किंवा दाळ देण्यात यावी, या मागणीचे निवेदन राहुरी तहसीलदारांना देण्यात आले.
केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य शिधापत्रिकाधारक व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. या योजनेतून स्वस्त धान्य वितरणाला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने यापुढे तांदूळऐवजी गहू किंवा दाळ देण्यात यावी, अशाी मागणी अतिक बागवान, गणेश खैरे, अफनान आतार, अरुण साळवे यांनी केली. सध्या तांदूळऐवजी गहू किंवा दाळीची नागरिकांना गरज आहे, असे अतिक बागवान यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment