वीरवस्ती ते कर्जत रस्त्याची झाली चाळणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

वीरवस्ती ते कर्जत रस्त्याची झाली चाळणी

वीरवस्ती ते कर्जत रस्त्याची झाली चाळणीनगरी दवंडी/प्रतिनिधीकर्जत ः कर्जत शहरातील वीरवस्ती ते कर्जत या दरम्यान रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्यावर बुवासाहेब मंदिरासमोर आज वृक्षारोपन करून गांधीगिरी केली भाजप नेते सुनील काका  यादव, ऍड धनंजय राणे, आप्पा काळे, रमेश गांगर्डे,  बंटी यादव, भूषण शिंदे,  विशाल जाधव,  रोहित तोरडमल, प्रकाश पेटकर हे उपस्थित होते. अमरापूर बारामती रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू असून मिरजगाव ते बहिरोबावाडी अत्यंत चांगला रोड झाला आहे. मात्र कर्जत शहर ते वीर वस्ती या दोन किलोमीटर मधील रस्त्याची चाळण झाली असून याठिकाणी रस्ता आहे की खड्डा हेच समजत नाही असे म्हणत भाजपा नेते सुनील यादव यांनी आठ दिवसात या दोन किमी रस्त्याचे काम न झाल्यास ठेकेदारास काळे फासू असा इशारा देत या सर्वानी रस्त्यावर दोन झाडे लावली, व त्वरित रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment