शिरसगाव नियोजित सप्ताह यंदा सरला बेटावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

शिरसगाव नियोजित सप्ताह यंदा सरला बेटावर

शिरसगाव नियोजित सप्ताह यंदा सरला बेटावर
नगरी दवंडी/प्रतिनिधीश्रीरामपूर ः सद्गुर गंगागिरी महाराज 173 वा अखंड हरीनाम सप्ताह श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे उड्डाणपुलाजवळ महंत रामगिरी महाराज यांच्या मंजुरीने नियोजित झाला होता परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरोना महामारी मोठ्या संकटामुळे व शासनाने आदेश पाळून सदर सप्ताह शिरसगाव ऐवजी सरला बेटावर फक्त 50 भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.त्याचे नारळ 16 जुलै रोजी पुणतांबा येथे प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात येईल.इतर सर्व कार्यक्रम फक्त पाच भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.कोणत्याही भाविकांनी सरला बेटावर येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.सप्ताहाचा आनंद घरबसल्या टीव्ही,मोबाईल वरून प्रक्षेपण पाहता येणार आहे.प्रशासनाच्या वतीने गोदावरी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.याबाबत सर्व माहिती महंत रामगिरी महाराज हे पुणतांबा येथे 16 जुलै रोजी देणार आहेत.शिरसगाव येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत 24 /7/2020 ते 31 जुलैपर्यंत सप्ताह घेण्यासाठी शिरसगाव ग्रामस्थांनी प्रयत्न केला होता परंतु सुरक्षा व्यवस्था विचार करून  श्रीरामपूर शहर पोलीस प्रशासनाने 8 जुलैच्या पत्राप्रमाणे कोरोना संकट व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाना बंदी आहे.असल्याने जिल्हाधिकारी यांचेकडे संपर्क साधावा असे सप्ताह सचिव दिनकर यादव यांना कळविले होते.
सप्ताह संदर्भात सरला बेट येथे महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आ.रमेशराव बोरनारे,कडूभाऊ काळे, बाळासाहेब कापसे,बाबासाहेब चिडे, किशोर अण्णा थोरात, संदीप पारख, मधुमहाराज कडलग, अनिल पवार,सोमनाथ महाले, श्रीरामपूर तहसीलदार, व अधिकारी उपस्थित होते,

No comments:

Post a Comment