श्रीगोंदा शहर मुसळधार पावसाने न्हाऊन निघाले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 8, 2020

श्रीगोंदा शहर मुसळधार पावसाने न्हाऊन निघाले.

श्रीगोंदा शहर मुसळधार पावसाने न्हाऊन निघाले.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.8: श्रीगोंदा शहराला दुपारी अचानक आलेल्या पावसाने झोडपून काढले. सकाळी आकाश निरभ्र होऊन दुपारी एक वाजेपर्यंत उष्मा व उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या हवेतील उष्णतेमूळे नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. पण अचानक वातावरणाचा नूर पालटल्याने कोळेभोर आकाश दाटून आले. आणि वार्‍यासहीत अचानक दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने. खेडोपाड्यातील तालुक्याला कामानिमित्त आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शनिचौकात ट्रॅफिक जाम झाली.
          सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यावर पाणीच पाणी वाहू लागले. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती या कार्यालयात आलेल्या बाहेरगावच्या लोकांची आसरा शोधण्यास धावपळ उडाली. शहराबरोबरच आसपासच्या परिसर व काही गावांमध्ये चांगला पाऊस पडला. त्यामुळे एका बाजूला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खरीप हंगाम पदरात पडल्याचे समाधान बळीराजा व्यक्त करताना दिसत होता.पावसाबरोबर बळीराज्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खुरपण्या लांबल्याने महागड्या तणनाशकाचा अनाठायी खर्च वाढला आहे. त्याचबरोबर उशिरा पेरणी करणार्‍यांच्या पेरण्या वापशे येईपर्यंत लांबल्या आहेत. यावर्षी असाच पाऊस बरसत राहिला तर ऊस लागवड क्षेत्र कमालीचे वाढणार आहे.

No comments:

Post a Comment