सोमवार 6 जुलै पासून सुरू नगर जिल्ह्यातील पहिलेच खाजगी कोवीड हॉस्पिटल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 4, 2020

सोमवार 6 जुलै पासून सुरू नगर जिल्ह्यातील पहिलेच खाजगी कोवीड हॉस्पिटल

                       नगर जिल्ह्यातील पहिलेच खाजगी कोवीड हॉस्पिटल




अहमदनगर : नगर जिल्ह्यातील पहिले खाजगी फक्त कोविड हॉस्पिटल जे चायना मधील वुहान मॉडेल सारखे असणार आहे इथे फक्त कोरोना बाधित पेशंटवर उपचार करण्यात येतील येथे सर्व अत्याधुनिक उपचार यंत्रणा उपलब्ध केली गेली आहे व राज्य सरकारने खाजगी दवाखान्यासाठी जाहीर केलेल्या दरात कोरोना बाधित रुग्ण यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती डॉ एस एस दीपक, डॉ बापूसाहेब खांडेकर, डॉ अभिजित पाठक यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील पहिले खाजगी कोविंड हॉस्पिटल सोमवारी दि. 6 जुलै रोजी सुरू होणार असून सुरुवातीला 50 बेड आणि नंतर 50 बेड ज्यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रणा ज्यामध्ये तपासणी ऑक्सिजन व्यवस्था व्हेंटिलेटर एक्स-रे सोनोग्राफी इत्यादी सुविधा असणार आहेत. यासोबतच स्वच्छता आणि इथे प्रसन्न वातावरण राहणार आहे. साईदीप हॉस्पिटल नोबेल हॉस्पिटल आणि स्वास्थ्य हॉस्पिटल हे नॉन कोविंड हॉस्पिटल राहतील जुने दीपक हॉस्पिटल मध्ये फक्त कोविंड पेशंट ठेवले जातील. व त्यांच्या वर उपचार केले जाणार आहेत. ज्यामुळे सरमिसळ होणार नाही. आणि सामान्य लोकांमध्ये कुठलेही भीती व गैरसमज राहणार नाहीत.
उच्च प्रतीचा सेवा आणि तेही ही राज्य सरकारने जाहीर केलेल्या या माफक रेटस मध्ये उपचार केले जाणार आहेत. सध्या 3 हॉस्पिटल ने एकत्रित येऊन हा निर्णय घेतला असून, पुढच्या टप्प्यात मॅक्स केअर श्री साईदीप हॉस्पिटल आणि साई एशियन हॉस्पिटल सामील होणार असे डॉ कांडेकर व डॉ पाठक यांनी सांगितले. नगर शहर आणि जिल्ह्यात, बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरिक यांच्यामुळे बाधीत पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. जीवाचा धोका निर्माण झाला आहे, परंतु नागरिकांनी सावधानता ठेवून आपण निश्चित कोरोना बरोबर लढू असे निश्चय करून काळजी घेणे गरजेचे आहे .चांगल्या उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध करून त्याबरोबरच कोरोनाचे रुग्ण निश्चित बरे होतात हा संदेश सुद्धा या खाजगी कोरोना हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्याचा आमच्या प्रयत्न आहे, असे डॉक्टर दीपक म्हणाले. यावेळी डॉ सतीश सोनवणे डॉ अमित बडवे डॉ सचिन पांडुळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment