6 महिन्यांपासून रखडलेल्या...स्थायी समितीच्या सदस्यांची निवड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 30, 2020

6 महिन्यांपासून रखडलेल्या...स्थायी समितीच्या सदस्यांची निवड.

6 महिन्यांपासून रखडलेल्या...
स्थायी समितीच्या सदस्यांची निवड.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सहा महिन्यापासून प्रतिक्षेत असणार्‍या स्थायी समितीच्या रिक्त जागांची महापौर बाबासाहेब वाकळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत महापालिकेच्या सभागृहात 8 सदस्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, काँग्रेस गटनेत्यांनी सुचविलेली नावे महापौरांनी जाहीर केली.राष्ट्रवादीच्या 3, भाजपा व शिवसेनेच्या प्रत्येक 2 व काँग्रेसच्या 1 सदस्यांची नावे महापौरांनी जाहीर करून नूतन सदस्यांची अभिनंदन केले. शिवसेनेचे श्याम नळकांडे, विजय पठारे, भारतीय जनता पक्षाचे मनोज कोतकर, सोनुबाई शिंदे, राष्ट्रवादीचे सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, प्रवीण कुरेशी, काँग्रेसच्या सुप्रिया जाधव या 8 सदस्यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. निवडल्या गेलेल्या सदस्यांचा कार्यकाल दीड वर्षांचा असणार आहे. आता सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची युती तोडणार, की महाविकास आघाडीचा धर्म पाळणार हे एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
दुपारी एक वाजता स्थायी समिती सदस्यांची निवडीची सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. शिवसेनेच्या गटनेत्या  रोहिणी शेंडगे, भाजपच्या गटनेत्या मालन ताई ढोणे, राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांनी महापौरांकडे  स्थायी समिती सदस्यांची नावे दिली व महापौरांनी ती नावे जाहीर केली. डिसेंबर 2018मध्ये मनपाची चौथी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पहिली स्थायी समिती जानेवारी 2019मध्ये अस्तित्वात आली. एक वर्ष पूर्ण झाल्यावर चिठ्ठ्या काढून 8 सदस्य 31 जानेवारी 2020 रोजी निवृत्त झाले. यात शिवसेनेचे गणेश कवडे, विद्या खैरे व अमोल येवले, राष्ट्रवादीचे अविनाश घुले, दीपाली बारस्कर व शोभा बोरकर, काँग्रेसच्या संध्या पवार व भाजपचे मनोज कोतकर या नगरसेवकांचा समावेश होता. यात सेनेचे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 3 तसेच काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी वड
एक नगरसेवक होता. त्यांच्या या रिक्त जागी अशाच पक्षीय सदस्य संख्येनुसार नवे सदस्य नियुक्त होणार होते. पण फेब्रुवारी महिन्यात प्रभाग 6 अ या जागेच्या पोटनिवडणुकीत सेना उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्याने मनपातील पक्षीय बलाबल बदलले व सेनेची 24 नगरसेवकांची संख्या एक जागा कमी झाल्याने 23 झाली व भाजपची 14 नगरसेवकांची संख्या एकने वाढून 15 झाली. स्थायी समितीत सेनेचे संख्याबळही एकही कमी होऊन ते सहावरून पाचवर आले. तर भाजपचे 3 वरून एकने वाढून 4 झाले. परिणामी रिक्त झालेल्या जागांमधील सेनेची एक जागा कमी होऊन भाजपची एक वाढली आहे. त्यामुळे आता रिक्त 8 जागांमध्ये राष्ट्रवादीचे 3, सेना व भाजपचे प्रत्येकी 2 व काँग्रेसचा एक सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. जानेवारीच्या शेवटी महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांची चिठ्ठी टाकून निवृत्ती करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय अडचणी व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थायी समितीतील आठ नवीन सदस्यांची निवड थांबलेली होती. मात्र राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानंतर महापौर वाकळे यांनी स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या निवडीसाठी ऑनलाइन महासभा आज लावली होती.ही निवड महापालिकेच्या ऑनलाईन झालेल्या महासभेतून करण्यात आलेली आहे. केवळ 13 मिनिटांतच ही सभा उरकली.महापालिकेची महासभा ऑनलाइन झाली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगररचनाकार राम चारठाणकर आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment