गरजूंना मदतीचा हात या भावनेने राष्ट्रवादीचे कार्य ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 7, 2020

गरजूंना मदतीचा हात या भावनेने राष्ट्रवादीचे कार्य ः आ. संग्राम जगताप

गरजूंना मदतीचा हात या भावनेने राष्ट्रवादीचे कार्य - आ. संग्राम जगताप
राष्ट्रवादीच्या वतीने सारोळाबध्दी येथील भैरवनाथ मंदिर देवस्थानसाठी पाण्याची टाकी भेट

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रत्येक गरजूंना मदतीचा हात या भावनेने राष्ट्रवादीचे कार्य सुरु आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन सर्वसामान्यांची कामे राष्ट्रवादीच्या माध्यमातून मार्गी लावली जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात देखील सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करण्यात आल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सारोळाबध्दी (ता. नगर) येथील भैरवनाथ मंदिर देवस्थानसाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली. या टाकीच्या लोकार्पणप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, ओबीसी सेलचे अमित खामकर, बाबासाहेब गाडळकर, दिपक खेडकर, संतोष लांडे, सरपंच सचिन लांडे, माजी सरपंच बाळासाहेब पुंड, आकाश हजारे, सिध्दू ठोंबरे, दिलदारसिंग बीर, आरिफ शेख, संतोष ढाकणे आदि उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त जमा झालेले शैक्षणिक साहित्य शाळा सुरु झाल्यावर गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात देखील विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   

No comments:

Post a Comment