दूध दरवाढीसाठी कर्जत येथे रासपाचे पांडुरंगाला दुग्धाभिषेक घालत साकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 7, 2020

दूध दरवाढीसाठी कर्जत येथे रासपाचे पांडुरंगाला दुग्धाभिषेक घालत साकडे

दूध दरवाढीसाठी कर्जत येथे रासपाचे पांडुरंगाला दुग्धाभिषेक घालत साकडेनगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दुधाची दरवाढ व्हावी या मागणीसाठी आज कर्जत तहसील कार्यालयासमोर पांडुरंगाला साकडे घालत दुग्धाभिषेक करण्यात आला मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
कर्जत येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्जत तहसील कार्यालयासमोर पांडुरंगाच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून शेतकर्‍याच्या दुधाला 35 रुपये भाव देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात आले यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कायदेशीर नियमांचे पालन करीत मोजक्याच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. शासकीय स्तरावर दुधाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देता दुर्लक्ष केले जात असून या अगोदरही याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही येत्या दहा दिवसात दुधाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकर्‍यांच्या सहभागाने राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र सरकारला धडा शिकविण्यासाठी आंदोलन उभारू असा इशारा या निवेदनात देण्यात आला असून निवेदनावर रासपचे नेते भानुदास हाके मेजर, रमेश व्हरकटे, काशिनाथ देवकाते, संतोष कानडे, छगन गिरे, भाऊसाहेब व्हरकटे, बापू बिटके यांच्या सह्या आहेत आंदोलनानंतर रासपाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment