नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे वाहनाच्या धडकेत गाढव मृत्यूमुखी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 6, 2020

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे वाहनाच्या धडकेत गाढव मृत्यूमुखी

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे वाहनाच्या धडकेत गाढव मृत्यूमुखी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकाजवळ सोमवार (दि.6) रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत पहाटेच्या वेळी गाढव मृत्युमुखी पडले. अज्ञात वाहनाच्या धडकेत गाढव महामार्गाच्या मध्यमागी मृत्युमुखी पडल्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.एखादे वाहन या मृत्युमुखी पडलेल्या गाढवाच्या अंगावरुन गेल्यास मोठी दुर्गंधी पसरण्याचा मोठा धोका निर्माण शकतो. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या या गाढवाची ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.
सोमवारी पहाटे ही घटना घडलेली आसतांना दुपारी बारावाजेपर्यंतही या मृत गाढवाची विल्हेवाट न लावल्याने एखादे वाहन मृत्युमुखी पडलेल्या गाढवाच्या अंगावरुन गेल्यास मोठी दुर्गंधी पसरण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आसतांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पहाटे घडलेल्या घटनेची दुपारी बारा वाजेपर्यंतही दखल घेतली न गेल्यामुळे व्यापारी वर्गातून आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.


No comments:

Post a Comment