तरुणीचा प्रपोजला नकार; तरुणीच्या चुलत बहिणीवर युवकाचा चाकुहल्ला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 6, 2020

तरुणीचा प्रपोजला नकार; तरुणीच्या चुलत बहिणीवर युवकाचा चाकुहल्ला

तरुणीचा प्रपोजला नकार; तरुणीच्या चुलत बहिणीवर युवकाचा चाकुहल्ला
फियार्द दाखल करुन घेण्याऐवजी पोलिसांनी केली मुलीच्या बापास मारहाण

नगरी दवंडी/प्रतिनिधीनेवासा - नेवासा तालूक्यातील गिडेगांव येथील इयत्ता बारावीत शिक्षण घेत आसलेल्या एका विद्यार्थीनीला गावातीलच एका युवकाने प्रोपोज केला होता.या महाविद्यालयिन युवतीने या युवकाला नकार दिल्यामुळे मी तुला जिवंत सोडणार अशी धमकी दिली होती. या महाविद्यालयिन मुलीला या माथेफिरु युवकाने वारंवार प्रोपोज केले छेडछाड केली माञ या मुलीने नेहमीच नकार दिल्याचा राग मनात धरुन या युवकाने थेट या मुलीच्या वस्तीवर जावून तीच्या घरात प्रवेश करत घरात आसलेल्या 12 वर्षाच्या तीच्या लहान बहिनीवर चाकूने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केलीची घटना आठ दिवसापुर्वीच घडलेली आसून या घटनेची फिर्याद देण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयिन मुलगी व तीच्या वडिलांनाच मारहान केल्याने गिडेगांवात पोलिसांच्या या कृत्याचा तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
  याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, इयत्ता बारावीत शिक्षण घेत आसलेली ही युवती गिडेगांव येथून शिरसगांव येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ये - जा करत आसती या वेळेत गावातीलच एक माथेफिरु युवक या युवतीच्या मागे लागून नेहमी छेडछाड करत प्रोपोज करत असे,माञ ही मुलगी नेहमी नाकार देत आसल्याने एकतर्फी प्रेमातून हा युवक आठ दिवसापुर्वी या मुलीच्या घरी आला त्यावेळी महाविद्यालयिन युवती शेतात गेलेली आसतांना तीची लहानी चुलत बहीनी घरात आसल्याने या लहान बहिनीवर चाक्कूने सपासप वार करुन हा युवक पसार झाला.
या घटनेची फिर्याद दाखल करण्यासाठी महाविद्यालयिन मुलीचे वडील संजय तुकाराम गाकवाड व त्यांची महाविद्यालयिन मुलगी नेवासा पोलिस ठाण्यात गेले आसता पोलिसांनीच या मलीच्या बापाला मारहान करुन दम दिला. पोलिसांनी ही खबरदारी घेण्याऐवजी फिर्याद न घेता तीला व तीच्या बापाला मारहान करुन अप्रत्यक्षपणे आरोपीला पोलिस सहकार्य करत आसल्याने पोलिसांची भूमिका समोर आल्याने पोलिसांच्या कृष्णकृत्याचा तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment