विषेश संपादकीय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 3, 2020

विषेश संपादकीय

                                               विषेश संपादकीय                                  
                                             तबलिंगींचा वेडाचार!

जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाला  आळा घालण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करून ठेवल्यामुळे प्रतिबंध लागलेले दिलासादायक चित्र असताना तबलीगी जमातीने कोरोणाचा प्रसार करण्यासाठी ज्या करामती केल्या आहेत त्या दोन दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या उघड करीत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांवर  हे तबलिगी थुंकनार असतील किंवा त्यांचेवर हल्ला करणार असतील तर तो त्यांचा धर्माचार नसून वेडाचार आहे. त्यांच्या या वेडाचाराची किंमत देशवासीयांना चुकवावी लागणार आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मकरसमध्ये झालेल्या तबलिगीच्या शिबिरात सहभागी झालेल्या हजारो नागरिक देशातील बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग वाटत आहेत. भोजनाच्या प्लेट, चमचे चाटून, नोटा चाटून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव करण्यासाठी तबलिगीचा हा वेडाचार विविध वाहिन्यांवर प्रसारित होत असताना सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी सह पुरोगामी, लोक याबाबत मुग गिळून आहेत. शरद पवारांनी काल मुसलमानांना घरात बसूनच सण साजरा करण्याचा सल्ला दिला पण थोडं कुठेही काही झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठविणार्‍या पवारांना गेल्या दोन दिवसापासून तबलिंगींना देशात काय उपद्व्याप चालवले आहे त्याविषयी बोलावं वाटलं नाही हा बेशरमपणा पवारांनाच शोभणार आहे.
शासनासह सर्व यंत्रणा कोरोणाशी लढण्यासाठी दिवस-रात्र एक करत असताना, हिंदुंनी सर्व व्यवहार ठप्प केले असताना काही मुस्लिम मात्र गर्दीचे एकत्रीकरण करून कोरोना रोखण्या ऐवजी उत्तेजन देत असतील तर  आपण स्वतः समवेत दुसर्‍यांना घेऊन मरायचे अशी घातकी मानसिकता ते बाळगत आहेत. हिंदूंच्या विविध संप्रदायांनी मनस्वास्थ त्यासाठी विविध उपाय आदी गोष्टी सांगितल्या आहेत. श्रद्धाळू  हिंदू आपापल्या घरात बसून साधना करीत असताना दुसरीकडे मुस्लीम मात्र गर्दी करणे न थांबवता यंत्रणा व शासन यांना संकटात टाकत आहेत. अशांना विनाविलंब कठोरात कठोर शासन न केल्यास आप्तकाळा ची तीव्रता वाढणार आहे. करोणामुळे जागतिक पातळीवर नऊ लाख 40 सहस्त्र हून अधिक लोक संक्रमित तर 47 सहस्त्रा हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असताना काही मुस्लिम टिक टॉक सारख्या अ‍ॅपवर’ मास्क न लावण्याचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नये असे व्हिडिओ प्रसारित करीत आहेत. अनेक मशिदींमध्ये विदेशी मुसलमानांनी बेकायदेशीरपणे वास्तव्य केले आहे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. अल कायदा, जैश ए महंमद, आयसीएस अशा अतिरेकी संघटनांची माहिती सर्वांना आहे. या संघटना देशविघातक कारवाया करताना त्याची जबाबदारी खुलेपणाने स्वीकारतात हे आपण अनेक वेळा पाहिले आहे. पण जगातील 170 देशांमध्ये 97 वर्षापासून कार्यरत असणारी’ तबलिगी जमात ’आत्ताच प्रकाश झोतात आली असून प्रसारमाध्यमांनीही ही बाब अनेक वर्षापासून उघड होऊ दिली नाही हे एक एक फार मोठे षड्यंत्र आहे. तबलिगी जमातीचे मुख्यालय दिल्लीत असावं व याची कधी चर्चाच होऊ नये हे न उलगडणारे कोडे आहे. सौदी अरेबिया, ईरान या देशांमध्ये या संघटनेच्या इस्लाम प्रसारा बंदी घातली असताना भारतात मात्र या संघटनेला मुक्तपणे शहरात गावात राहण्याची परवानगी कशी काय दिली जाते?
मकरज चा अर्थ आहे केंद्र, आणि जमात चा अर्थ आहे समूह. इस्लाम चे अध्यक्ष मौलाना मोहम्मद इलियास यांनी 1926 ला या धार्मिक संस्थेची स्थापना केली. तबलीगी जमात चा अर्थ आहे की अशा लोकांचा समूह जो अल्लाह आणि दिन चा प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरा ना मानणारा समूह. संकल्प चांगला असताना 1926 नंतर 1941 तबलिगी जमातचा पहिला मोठा जाहीर कार्यक्रम झाला होता. पण यानंतर काही काळातच या संघटनेत अपप्रवृत्ती घुसल्यावर संघटनेच्या मूळ तत्वावर घाला घालून हिंदू द्वेषाचं राजकारण सुरू झालं. हिंदू म्हणजे काफर. नुकताच तबलिगीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला त्यात कोरोना ही अल्लाची देन व ती अल्लानेच काफरांना म्हणजे हिंदूंना संपविण्यासाठी पाठविली आहे असा व्देष पसरवला जात आहे. देशातील मुस्लिमांमध्ये व्देष पसरविण्याचे काम तबलिगी जमात करीत आहे. यापासून मुस्लिमांनी सावध व्हायला हवे. नॅशनल सिटिझन बिल या कायद्याला मुस्लिम समाजा मधून जो विरोध होत आहे तो अनाठायी आहे. बिल म्हणजे प्रत्येक नागरिक कुठे राहत आहे याची नोंद. या काद्याद्वारे मिळू शकते. हे बिल अस्तित्वात आले असते तर बाहेरच्या देशातून आलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना शोधण्यासाठी शासनाला जी धावपळ करावी लागत आहे ती करावी लागली नसती. तबलीगी जमातीच्या उद्भवलेल्या या प्रकरणाने एन.सी.आर. कायद्याची देशाला किती मोठी गरज आहे हे दाखवून दिलं आहे. सारा देश लॉक डाऊन चे पालन करत आहे पण दिल्लीच्या निजामुद्दीन मधील हा प्रकार देशाला चिड आणणारा आहे. तसेच देशाच्या जीवावर बेतणार आहे नक्कीच आहे. ही बेपर्वाई कोणाची याचा छडा लागलाच पाहिजे. दिल्लीचे सरकार झोपले होते की काय? किंवा यामागे मोठे षडयंत्र आहे काय याचा शोध तातडीने लागला पाहिजे. अन्यथा काळ कुणालाच माफ करणार नाही.परिषदेतून धर्मप्रसार कार्यासाठी म्हणून देशाच्या काही भागात गेलेल्या या लोकांचा कोणा कोणाशी संपर्क आला याचा तपास करणे मोठे कठीण काम आहे. त्यातून मोठा फैलावं झाला तर देशाला अनर्थ पाहावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातून अधिक लोक गेल्याची माहिती उजेडात आल्याने राज्यालाही संसर्गाचा मोठा धोका असू शकतो. इतके लोक जमले असताना पोलिसांना वाद दिल्लीकरांना हे समजले कसे नाही? ही बाब ठाऊक होती तर पोलिसांनी काय काळजी घेतली? केजरीवाल यांचे सरकार काय करत होते? आपला देश अजूनही पहिल्याच टप्प्यात आहे. संपूर्ण देश काळजी घेत असताना या परिषदेला मान्यता कोणी दिली .पंधरा दिवस होऊनही या गर्दीची कुणकुण लागली कशी नाही, देशाच्या गृह खात्याला ह्याची खबर कशी लागली नाही आता सरकारी पातळीवर टोलवाटोलवी चे उद्योग सुरू होतील, देशावर अनर्थ ओढवला तर त्याची जबाबदारी कोणावर?

No comments:

Post a Comment