विखे पाटील हॉस्पिटलमध्ये सर्व प्रसुती मोफत होणार! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 21, 2020

विखे पाटील हॉस्पिटलमध्ये सर्व प्रसुती मोफत होणार!

विखे पाटील हॉस्पिटलमध्ये सर्व प्रसुती मोफत होणार!

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगर मधील सिविल हॉस्पिटल हे र्लेींळव हॉस्पिटल म्हणजेच कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. आरक्षित सिविल हॉस्पिटल मध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्ण येतात. अश्या वेळी प्रस्तुती साठी येणार्‍या माता-भगिनींनाचे हाल होऊ नये व त्यांना दर्जेदार सेवा देण्याच्या हेतूने डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट अहमदनगर यांनी पुढाकार घेतला आहे.जो पर्यंत अहमदनगर जिल्हा रुग्णालय हे र्लेींळव हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे तोपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रसूति डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये होतील व हा सर्व खर्च विखे पाटील परिवाराच्यावतीने उचलण्यात येईल व या दरम्यानच्या काळात रुग्णालयात येणार्‍या कुठल्याही माता-भगिनींना अडचण निर्माण होणार नाही आणि त्यांना अधिक चांगल्या व दर्जेदार सेवा डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट यांच्यामार्फत देण्यात येतील अशी माहिती अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार  संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ह्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आणि प्रशासन ने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ विखे यांनी आभार व्यक्त केले.डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांनी ह्यापूर्वी देखील खासदार डॉ विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 60 ते 70 आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून जवळजवळ एक लाख रुग्णांना मोफत उपचार केलेले आहेत.

No comments:

Post a Comment