कोरोनापेक्षाही भयंकर नरकयातना भोगतायं साईराम सोसायटीतील नागरिक... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 21, 2020

कोरोनापेक्षाही भयंकर नरकयातना भोगतायं साईराम सोसायटीतील नागरिक...

कोरोनापेक्षाही भयंकर नरकयातना भोगतायं साईराम सोसायटीतील नागरिक...
ड्रेनेज तुंबले, डासांचं मोहोळ! शौचालयातील मैला रस्त्यावर



नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागोजागी गटार तुंबलीत... शौचालयातील मैला पिण्याच्या पाईपलाईनमध्ये पसरलाय... डासांचं मोहोळ काना नाकात गुणगुणतयं... घरांच्या भिंती पाण्याने ओलसर झाल्यात..... ताप येतोय... जुलाब होत आहेत... सांगाव कोणाला? कोरोणामुळे दवाखाने बंद आहेत... एक वेळ कोरोना परवडला.. पण या नरक यातना आम्ही किती दिवस भोगायाच्या? सहा महिन्यापासून आम्ही नरक यातना भोगतोय... आयुक्तांना पासून ते महापौरांपर्यंत सर्वांना भेटलो पण.... पण कोणी दखल घेत नाही... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत योजनेच्या रेटिंग साठी बॅनर, पोस्टर लागलेत पण....महापालिका प्रशासनाने स्वच्छ भारत योजनेचा कसा बोजवारा उडवला आहे हे पाहायचं असेल तर कल्याण रोडवरील साईराम सोसायटीमध्ये प्रशासनाने पुन्हा एकदा जाऊन पाहण्याची गरज आहे.
साईराम सोसायटीतील सोमनाथ बोराडे, राजू पंचमुख, दिनेश शिंदे, श्रीपाद वाघमारे, उमेश शिरसागर, अतुल मिसाळ, नागेश ओव्हाळ, दादासाहेब फाळके, शंकर बोरुडे, मच्छिंद्र चौकटे, दिगंबर भडकवाड, सुरेखाताई भागवत, शकुंतला शिंदे, समीना शेख, सौ.बिडकर या नागरिकांशी नगरी दवंडी प्रति नीधीने चर्चा केली तेव्हा त्यांचा  आक्रोश विचार करायला भाग पाडतोय. या परीसरातील 250 कुटुंबातील 1300 नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलय.साईराम सामाजिक सोसायटीचे अध्यक्ष सुनिल शिंदे व सदस्य दत्तात्रय पारखे यांच्याशी बोलताना या परिसरातील नागरिकांना किती मरणयातना भोगाव्या लागत आहेत याची जाणीव होतेय. ड्रेनेजच्या पाईप लाईन फुटल्यामुळे ड्रेनेज मधील घाण पाणी सोसायटीतील घरांमध्ये घुसू लागलयं. त्यामुळे घराच्या भिंती ओलसर झाल्या आहेत. अंघोळीचे, भांडी घासल्याचे खरकटे, सतत लिकेजचे पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे कॉईल, गुड नाईटला मच्छर दाद देत नाही त्यामुळे हिवताप, विषमज्वर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अनेक महिला ,पुरुष, मुलांना ताप येतोय पण लॉक डाऊन मुळे दवाखाने बंद आहेत.
सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे. रोगराई पसरू नये हे महापालिकेचे काम आहे पण महापालिका प्रशासन झोपा काढतयं.महापालिका आयुक्त  पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेत पण पुढे काहीच प्रगती झालेली नाही.स्वच्छ भारत स्वच्छ शहरचा नारा देत महापालिका प्रशासनाने घराघरात जाऊन नागरिकांकडून मोबाईलवर रेटिंग मागितलं पण या परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे कोरोणाची धास्ती  अनं या परिसरातील अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे कोरोनाच्या फैलाव रोखताना दुसर्‍याचं साथीने तोंडवर काढल्यास जबाबदार कोण? परिसरातील सुनील शिंदे,सोमनाथ बोराडे, राजू पंचमुख, दिनेश शिंदे, श्रीपाद वाघमारे, उमेश शिरसागर,अतुल मिसाळ, नागेश ओव्हाळ, दादासाहेब फाळके, शंकर बोरुडे, मच्छिंद्र चौकटे, दिगंबर भडकवाड, सुरेखाताई भागवत, शकुंतला शिंदे, समीना शेख, सौ.बिडकर या सर्वांशी बोलताना या परिसरातील नागरिकांचा महापालिका प्रशासनावर किती रोष आहे हे ध्यानात येते. सांडपाणी म्हणजे अशुध्द, वापरलेले पाणी. सांडपाणी घरांतून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो. पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणार्या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.याचा विचार घेणे गरजेचे आहे.
नगर कल्याण रोडवरील ड्रेनेजची मेनलाईन खराब झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रश्नाबाबत महापौर व आयुक्तांची  बोलणे झाले असून हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवेचे पास देऊन हे काम आठ-दहा दिवसात पूर्ण करण्यात येईल.
- सर्व नगरसेवक (प्रभाग क्रमांक आठ)

सध्या करोना सारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक कोरोना पासून बचावाकरिता सांगण्यात येणार्‍या उपायांचे नियोजन गांभिर्याने करण्यावर भर देत आहेत. मात्र कोरोनाला रोखण्याकरिता नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना या कोरोनाला रोखण्यास फायदेशीर ठरतीलही. मात्र हेच होत असताना या परीसरातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे शहरवासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणार्‍या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्ची होतो? या परीसरातील अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणार्‍या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.तेव्हा नागरिक शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जिवित्वाशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणार्‍या निधीचा वापर करुन शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.



No comments:

Post a Comment