कोरोनाच्या युद्धात युवकांनी केले रक्तदान : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 21, 2020

कोरोनाच्या युद्धात युवकांनी केले रक्तदान : आ. जगताप

कोरोनाच्या युद्धात युवकांनी केले रक्तदान : आ. जगताप
राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने जिल्हा रुग्णालयात 91 युवकांनी केले रक्तदान

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मागील दोन महिन्यांपासून कोरोना महामारीच्या आपत्तीचा मुकाबला देशभर सुरु आहे. कोरोनाचे संकट थोपावण्यासाठी सरकार आणि प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. आपत्तीच्या काळात रक्ताची उपलब्धता असण्याची गरज असते. परंतु या आपत्तीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा विविध आजारातील रुग्णांसाठी जाणवत आहे.
लॉकडाऊनमुळे कुठेही रक्तदान शिबिराचे आयोजन झाले नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कोरोनाच्या लढ्यात प्रशासन, आरोग्य, पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असताना अनेक सुजाण नागरिक या काळात आपले योगदान देत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आपत्तीच्या काळात देखील सामाजिक भावनेतून पुढे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मदतीचे अनेक हात कोरोनाच्या लढ्यात पुढे येत असताना या युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून केलेली मदत समाजास दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
जिल्हा रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे पालन करून राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संग्राम जगताप समवेत युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे व रक्तदाते उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिजित खोसे म्हणाले की, कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन झाले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. विविध आजारातील रुग्णांना रक्त पुरवठ्याची नियमित गरज भासत असते. यामुळे आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 91 युवकांनी रक्तदान करून आपले योगदान दिले आहे. रक्तदान शिबीर ही काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment