निमगाव वाघात घरोघरी डॉ. आंबेडकर जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

निमगाव वाघात घरोघरी डॉ. आंबेडकर जयंती साजरी

निमगाव वाघात घरोघरी डॉ. आंबेडकर जयंती साजरी
निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमध्ये घरीच साजरी करण्यात आली. (छाया-वाजिद शेख-नगर)
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमध्ये घरोघरी साजरी झाली. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, बाबूराव जाधव, मंदाताई डोंगरे, प्रतिभा डोंगरे, तेजस्विनी डोंगरे, मयुर काळे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment