केडगांव भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 29, 2020

केडगांव भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

केडगांव भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
 दवंडी /प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्या देशभर असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सर्वत्र बंद आहे. या बंदमध्ये अनेक छोटे-मोठे क्लिनिक व दवाखानेही बंद आहेत. त्यामुळे किरकोळ आजारांवर सध्या घरगुती उपचार करत आहेत. यासाठीच  भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्सच्यावतीने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम शहरातातील नागरिकांसाठी राबविण्यात आला आहे. यामुळे आपल्या घराजवळच तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध झाली आहे. तपासणी करुन मोफत औषधे दिली जात असल्याने नागरिकांची मोठी सोयी यानिमित्त झाली आहे.
डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत केडगांव येथील प्रभाग क्रमांक 17 मधील  इंदिरानगर जिल्हा परिषद शाळा, केडगांव मनपा कार्यालय, मोहिनीनगर परिसरातील नागरिकांची डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नन्नवरे व सुरज शेळके यांनी नागरिकांना याबाबत आवाहन केले होते, त्याप्रमाणे नागरिकांनी आपल्या भागात ही व्हॅन आल्यानंतर सोशल डिस्टिंगचे पालन करुन  डॉक्टरांकडून उपचार करवून घेतले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांचा अधिक सहभाग होता. यावेळी डॉक्टरांनी नागरिकांना कोरोना विषाणूची भिती न बाळगता काळाजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करुन कोरोना विषयीच्या शंका, भिती दूर केली.
यावेळी मनोज कोतकर म्हणाले, सध्याच्या बंद कालावधी नागरिकांच्या आरोग्याबाबत किरकोळ स्वरुपाच्या समस्या या उपक्रमाद्वारे दूर होण्यास मदत झाली आहे. यापुढील काळातही प्रभागातील नागरिकांना सर्वोतोपरि सहकार्य करु,असे सांगितले.

याप्रसंगी गणेश नन्नवरे म्हणाले, लॉकडाऊनमुळे आज अनेक नागरिकांना बर्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याचा आम्ही सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न सुरु आहेत, त्याचाच एक भाग म्हणून हा आरोग्यदायी उपक्रम या भागातील नागरिकांसाठी राबविला आहे. गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र बंद असल्याने परिसरातील नागरिकांनी ही सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगरसेवकांसह यांच्यासह आयोजकांचे आभार मानले. डॉक्टर आपल्या दारी प्रकल्पाचे आयोजक  संजय चोपडा, प्रशांत गांधी, आदेश चंगेडिया आदिंनी शहराच्या विविध भागात हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment