कोरोनाच्या पार्शभूमीवर बोरुडे परिवाराचा रक्तदानासाठी पुढाकार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 29, 2020

कोरोनाच्या पार्शभूमीवर बोरुडे परिवाराचा रक्तदानासाठी पुढाकार

कोरोनाच्या पार्शभूमीवर बोरुडे परिवाराचा रक्तदानासाठी पुढाकार
45 युवकांनी केले रक्तदान, इतरांनी रक्तदान करण्याचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केले आव्हान
नगरी दवंडी /प्रतिनिधी

अहमदनगर ः सध्या देशभरात कोरोना व्हायरसच्या सातीमुळे हाहाकार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारतात लॉक डाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 144 लागू आहे. नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यामुळे ज्या रुग्णांना रक्ताची अतंत्य आवशकता आहे त्यांना रक्त सहज मिळणे शक्य झाले पाहिजे म्हणून एक मदतीचा हात म्हणून माजी उपमहापौर अनिल बोरुडे सह त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तसेच मित्रमंडळाने  अर्पण रक्त पिढी येथे 45 जणांनी रक्तदान केले.
यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, जालिंदर बोरुडे,शरद बोरुडे,प्रसाद बोरुडे,ओमकार बोरुडे,गौरव बोरुडे,अभिषेक बोरुडे, अतुल राऊत,गणेश शिंदे,रमेश बोरुडे,विक्रम बोरुडे,गणेश बोरुडे,भूषण बोरुडे,सौरब बोरुडे,दिनेश बोरुडे,कैलास बोरुडे,पृथ्वी बोरुडे,वैभव नेमाने,अमोल चव्हाण,विजय बनकर,अमोल कळमकर,विजय ढाकणे,गणेश उधवंत,सत्यम बोरुडे, सागर मुळे,निलेश पाथरकर,स्वप्नील बोरुडे,आनंद बोरुडे उपस्थित होते.

याप्रसंगी अनिल बोरुडे म्हणाले संपूर्ण जगातील विविध देशात सद्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे.इतर देशान पेक्षा भारतात कोरोनाची लागण झालेले रुग्ण कमी आहेत कारण भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळेवर उपायोजना सुरु केल्यामुळे भारतात कोरोना जास्त पसरू शकला नाही. त्यामुळे जर आपल्याला कोरोना वर मात करायची असेल तर सर्वांनी भारतातील सरकारचे नियम आणि सांगितलेले उपाय केले पाहिजे नागरिकांनी घराच्या बाहेर पडून गर्दी करू नये. घरात राहून या कोरोनाशी लढण्यात आपले योगदान द्यावे, असे हि सांगितले.

No comments:

Post a Comment