भाजपाच्या वतीने 300 गरजू कुटुंबांना किराणा माल : दिलीप गांधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 27, 2020

भाजपाच्या वतीने 300 गरजू कुटुंबांना किराणा माल : दिलीप गांधी

भाजपाच्या वतीने 300 गरजू कुटुंबांना किराणा माल : दिलीप गांधी

 
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः हिंदू संस्कृतीत व जैन धर्मात अक्षय तृतीया या शुभमुहूर्ताला फार महत्व आहे. तसेच मुस्लीम समाजाचा रमजानचा पवित्र महिन्यास सुरवात झाली आहे. मात्र आपल्या सार्वांवर आलेल्या करोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आपले हजारो बंधू भगिनी अडचणीत असल्याने त्यांना या संकटकाळात मदत करणे आपले कर्तव्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षमपणे देशावर आलेल्या संकटाला दूर होण्यासाठी धाडसी निर्णय घेत परिस्थिती हाताळत आहेत. त्याच बरोबर राज्य सरकारही चांगले काम करून राज्यातील जनतेला दिलासा देत आहे. तसेच जिल्हा प्रशासनही सर्व जनता सुरक्षित राहण्यासाठी अहोरात्र चांगले परिश्रम घेत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरु केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरु असलेल्या मदत कार्यात नगर भाजपाही सहभगी होत शहरातील गरजू तसेच तृतीयपंथी नागरिकांना लॉकडाऊन संपेपर्यंत पुरेल एवढा किराणामालाची मदत करत आहे.
सर्वसामन्य नागरिकांचे जीवन या सणासुदीच्या दिवसात आनंदी व्हावे, त्यांनी घरीच राहून या सणांचा आनंद घ्यावा यासाठी हा उपक्रम राबवला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलप गांधी यांनी केले.

शहर भाजपाच्या वतीने दिलीप गांधी यांनी अक्षय तृतीया व रमजान निमित्त शहरातील 300 गरजू कुटुंबाना तसेच तृतीयपंथी नागरिकांना सर्व प्रकारचा किराणामालाचे वितरण करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी सोशल दिस्टंसिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करून किराणामालाच्या कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सौ.सरोज गांधी, अर्बन बँकेचे माजी संचालक दीपक गांधी, अजय बोरा, केदार लाहोटी, रोषण गांधी, रोकन गांधी, काजल गुरु आदि उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment