जिल्हा रुग्णालयात प्रचंड अनागोंदी....... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 3, 2019

जिल्हा रुग्णालयात प्रचंड अनागोंदी.......

स्पर्श न करता रुग्णांची तपासणी; औषधांचा अपुरा साठा
नगरी दवंडी वृत्तसेवा
अहमदनगर प्रतिनिधी ः  सर्वसामान्य नागरिकांना अल्प दरात रुग्णसेवेचा लाभ व्हावा, दिनदुबळ्या, गोरगरीब रुग्णांवर योग्य  उपचार व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. रुग्ण व डॉक्टर यांचे नाते म्हणजे आपुलकी व स्नेहाचा संगम. डॉक्टरांच्या केवळ स्मितहास्याने व आपुलकीच्या बोलण्याने आजारच पळून जावा अशी रुग्णांची भावना. 
पण नगरजिल्हा रुग्णालयात केसपेपर काढण्यापासून ते उपचार घेण्यादरम्यान रुग्णांना जो अनुभव येतो तो आश्चर्यकारक आहे. शस्त्र्रिक्रया कक्षापासून ते रक्तपेढीपर्यंत 41 कक्ष आहेत. जिल्हाक्षयरोग कक्ष केंद्रासह अंधत्व निवारण कक्ष इ. 12 इमारती  आहेत. 9 मे 1970 रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन डॉ. आरोग्यमंत्री डॉ. रफीक झकेरिया यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अनेकवेळा या इमारतीतील कक्षांचे नुतनीकरण करण्यात आले. रुग्णालयात प्रवेश केलेल्या रुग्णाला केसपेपरसाठी मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. केसपेपर काढल्यानंतर हव्या त्या कक्षात जावून तपासणी करावी लागते, ही तपासणी करताना नर्स अथवा डॉक्टर काय त्रास आहे ?  व किती दिवसांपासून हे दोनच प्रश्न विचारतात. रुग्णास ताप आला असेल तर हात लावूनही पाहिले जात नाही. खोकला येत असेल तर घसा सुजला की नाही हे देखील पाहिले जात नाही. दातदुखी चा त्रास असेल तर तोंड उघडून पाहण्याची गरज आहे. 
दात किडला आहे का, दात हलतो आहे काय याची तपासणीही केली जात नाही.
केसपेपर नोंदणीसाठी मोठ्या रांगेचे अग्निदिव्य पार पाडून देवदूत वाटणार्‍या डॉक्टरांना आजार सांगितला तर ते फक्त 3 दिवसांच्या गोळ्या देवून रुग्णाला हाकलुन देण्याचा विचार करतात. औषध कक्षातही भली मोठी रांग, नंबर लागलाच तर खोकल्याच्या औषधासाठी मोकळी बाटली आणली आहे का असा प्रश्न विचारतात. रुग्ण नाही म्हणाला तर बाजु होण्याची सुचना करतात लिहुन दिलेली औषधे नसल्यास बाहेरुन घेण्यास सांगतात. अशा अनागोंदी कारभाराविरुध्द कोणीच आवाज उठवत नसल्याने कर्मचारी निर्ढावल्याचे दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सक पी.एम. मुरंबीकर दीड महिन्यापासून रजेवर गेले असून, त्यांचा पदभार प्रभारी शल्यचिकित्सक बापूसाहेब गाडे यांच्याकडे दिला असल्याचे सूत्रांकडून समजते.

No comments:

Post a Comment