मनपाच्या विरोधी पक्ष नेतेपदी माझी निवड करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 5, 2019

मनपाच्या विरोधी पक्ष नेतेपदी माझी निवड करावी

मनपाच्या विरोधी पक्ष नेतेपदी माझी निवड करावी


शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांची महापौरांकडे मागणी

अहमदनगर  ः अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेता या पदावर माझी नियुक्ती करावी,अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. रोहिणी संजय शेंडगे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापौरांना सौ. शेंडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाने सर्वाधिक 24 जागा प्राप्त केल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करुन माझी शिवसेना गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील कलम 19(1) अ अन्वये जो निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असेल आणि महापौरांकडून ज्याला तशी मान्यता मिळाली असेल तो विरोधी पक्ष नेता असे. त्यानुसार शिवसेनेचे गट नेते म्हणून माझी नियुक्तीत झाली असल्याने मला विरोधी पक्ष नेता या पदावर नियुक्ती देणे आवश्यक आहे. याबाबत मी दि. 1 फेब्रुवारी रोजी आपणास पत्र दिलेले आहे.परंतु अद्यापही आपण माझी विरोधी पक्ष नेते या पदावर नियुक्ती केली नाही. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन 10 महिने झाले आहेत. महानगरपालिकेत कामकाजाच्या व लोकशाहीच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेता असणे गरजेचे आहे. तरी अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेता या पदावर माझी त्वरित नियुक्ती करण्यात यावी. 

यावेळी शिवसेनेचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, विजय पठारे, दत्ता कावरे, गणेश शिंदे, अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, संभाजी कदम, संजय शेंडगे, संतोष गेनप्पा व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment