‘त्या’ मनोरुग्णाबाबत शहरात अफवांचे पीक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 5, 2019

‘त्या’ मनोरुग्णाबाबत शहरात अफवांचे पीक

‘त्या’ मनोरुग्णाबाबत शहरात अफवांचे पीक



अहमदनगर  ः गेल्या तीन-चार दिवसांपासून तोफखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत वेगवेगळ्या भागात लोकांना चावणारा एक तरूण मनोरुग्ण फिरत असल्याबाबत अनेक फोन कॉल्स तोफखाना पोलीस स्टेशन येथे तसेच पोलीस कंट्रोल रूम येथे प्राप्त झालेले असून त्या फोन कॉल्सचे आधारे तात्काळ पोलिसांनी मिळालेल्या फोन कॉल्सच्या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांचे मदतीने खात्री केली असता असा कोणताही तरुण मनोरुग्ण  आढळून आलेला नाही तसेच चौकशीअंती त्या तरूण मनोरुग्णास प्रत्यक्ष पाहणारा कोणीही व्यक्ती पोलिसांना भेटलेली नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे नागरिक हे पोलिसांना अशा प्रकारची मनोरुग्ण व्यक्ती अमुक ठिकाणी आहे असे फोन कॉल्स करीत असल्याचे दिसून येत आहे.या संदर्भात पोलिस स्टेशनला प्राप्त होणार्‍या प्रत्येक फोनची गंभीरतेने शहानिशा पोलीस करीत आहेत. काही लोक त्यांना मिळालेल्या माहितीची शहानिशा न करता केवळ ऐकीव माहितीच्या आधारे लोकांना फोन करून अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत तसेच सोशल मीडियावरही या तथाकथीत तरुण मनोरुग्नाचे फोटो, व्हिडिओ, माहिती व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी ही सोशल मीडियावर प्रसारित झालेले या प्रकारचे व्हिडिओ, फोटो, माहिती खात्री न करता फॉरवर्ड करू नये. अशाप्रकारे चुकीची माहिती, चुकीचे व्हिडिओ, चुकीचे फोटो व्हायरल करून समाजामध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करणे हा एक अपराध असून तसे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.तसेच माणसांना चावणार्‍या अशा तथाकथित तरुण मनोरुग्नाबद्दल खात्रीशीर माहिती मिळून आल्यास तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशन अथवा पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment