जल्हयातील नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 25, 2019

जल्हयातील नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जल्हयातील नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन


 अहमदनगर  :  आगामी काळात अहमदनगर तसेच नशिक व पुणे जिल्हयात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्हयातून वाहणा-या  गोदावरी, भिमा, घोडे, कुकडी या  नदयांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात  येते की, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत.  नदी,ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
तसेच  नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पुर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुन्या /मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये, धबधबे डोंगर माथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये. धोकादायक ठिकाणी  सेल्फी  काढू नये, मेघगर्जना होत असताना  झाडांच्या खाली न थांबता  सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

 आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी  संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील  टोल फ्री क्रमांक 1077 आणि दुरध्वनी क्रमांक  0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा असे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रशांत पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.         

No comments:

Post a Comment