- Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 17, 2019

शिवसेनेने बोल्हेगाव -नागापूरला सर्वाधिक कामे केली  
युतीचे उमेदवार अनिल राठोड यांचा दावाः प्रचारफेरीस प्रतिसाद नागरिक कायम शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत, कारण त्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना कायम अग्रेसर राहिली आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने कायम अनेक आंदोलने केली आणि ह्या भागातील महत्त्वाचे रस्ते आहेत ते नवीन आणि उत्कृष्ट दर्जेदार करून दिली. त्यासाठी शिवसेनेच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल, तरीही शिवसैनिक कधी मागे फिरला नाही त्यामुळे या भागातील जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी प्रचारार्थ बोल्हेगाव नागपूर  भागातून प्रचार फेरी काढून  त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 
यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, दत्ता सप्रे निलेश भाकरे मदन आढाव अक्षय कातोरे भालचंद्र भाकरे रीता भाकरे व परिसरातील नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.   यावेळी नगरसेविका रीता भाकरे म्हणाल्या या परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहिली आहे नागरिकांच्या अर्जुनी सोडवण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आम्ही कायम केला आहे नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून अहोरात्र काम करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत या भागातून शिवसेनेला विधानसभेमध्ये  सर्वात जास्त मताधिक्क्याने जनता विजयी करेल असे सांगितले.  

No comments:

Post a Comment