रिपाइं संघटनांचे शिवसेनेविरोधात बंड! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 17, 2019

रिपाइं संघटनांचे शिवसेनेविरोधात बंड!

रिपाइं संघटनांचे शिवसेनेविरोधात बंड!

राष्ट्रवादीचे आ. जगताप यांच्या प्रचारात कार्यकर्ते सक्रिय




नगर ः  नगर जिल्ह्यात शिवसेनेविरोधात बंड पुकारुन शहरातील आरपीआयचे पदाधिकारी व आंबेडकरी विचारांच्या विविध 50 संघटनांनी नगर शहर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहिर केला. काही दिवसापासून आरपीआयचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शिवसेने विरोधात तीव्र नाराजी होती. शिवसनेने देखील या कार्यकर्त्यांची मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला आहे.
दलित पँथर्सचे ज्येष्ठ नेते विजयकांत चाबुकस्वार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यात आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आर.पी.आय. (आठवले)गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), आर.पी.आय. (गवई), भीमशक्ती, भारतीय दलित महासंघ, लोकशाही विचार मंच, शाहू बॉईज ग्रुप, बहुजन रयत परिषद, संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, वीर लहुजी वस्ताद, मातंग समाज संघटना, अखिल भारतीय गवळी समाज संघटना आदींसह चळवळीतल्या 50 संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा दर्शवून त्यांना मताधिक्याने निवडून आनण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आरपीआयचे अजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्याप्रसंगी सुरेश बनसोडे, जेव्हिअर भिंगारदिवे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, अशोक केदारे, दीपक मेढे, रमेश भिंगारदिवे, संदीप वाघमारे, कौशल गायकवाड, नितीन कजबेकर, महेश भोसले, सुनील शेत्र, सुमेध गायकवाड, किशोर बोरुडे, संजू जगताप, समीर भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, दगडू पवार, अजिंक्य भिंगारदिवे, सुनील उमाप, विजू वडागळे, नाथा अल्लाट, अनुसया भाकरे, सुशांत म्हस्के, दानिश शेख, बंटी भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, निलेश बांगरे, पप्पू पाटील आदींसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीतील शिवसेना पक्षाने आरपीआयचे उमेदवारांना जागा सोडली नसल्याने व आरपीआयच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने सर्व आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. शहरात देखील शिवसेना आरपीआयच्या पदाधिकार्यांना सन्मानाची वागणुक देत नसल्याने बंडाची भुमिका घेण्यात आली आहे. मेळाव्याचे सूत्रसंचालन महेश भोसले यांनी केले.

No comments:

Post a Comment