शिवाजीनगर परिसरात पावसाचे पाणी घरात... घरे व शाळा पाण्याखाली ; नागरिक त्रस्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 25, 2019

शिवाजीनगर परिसरात पावसाचे पाणी घरात... घरे व शाळा पाण्याखाली ; नागरिक त्रस्त

शिवाजीनगर परिसरात पावसाचे पाणी घरात... घरे व शाळा पाण्याखाली ; नागरिक त्रस्त 

\
महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त भालसिंग यांच्याकडून पाहणी 

                                                        

अहमदनगर  ः  नगर शहरातील शिवाजीनगर येथील कॉलनीमध्ये पावसाचे पाणी परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या घरांमध्ये घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. तसेच येथील शाळा व अंगणवाडीही पाणी खाली गेली आहे. या सर्व परिस्थितीची माहिती नगरसेवक श्याम नळकांडे, सचिन शिंदे,संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी महापालिका प्रशासनाला देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी शुक्रवारी (दि.25) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर कल्याणरोड परिसराची पाहणी केली.
   शिवाजीनगर परिसरातील भावनाऋषी सोसायटी, साईराम सोसायटी, प्रशांत सोसायटी, बालाजी सोसायटी, व्यंकटेश सोसायटी, गणेशनगर, विद्या कॉलनी आदींसह कल्याणरोड परिसरात पाऊसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने अनेक नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरिकांनी मंदिरात, शाळेत जाऊन झोप काढली. या परिसरातील चिखलमय वातावरण पाहून नगरसेवक श्याम नळकांडे व सचिन शिंदे यांनी पावसाच्या पाण्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत महापालिका प्रशासनाला सांगितले. या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शुक्रवारी (दि.25) सकाळी 11 वाजता महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त भालसिंग व अभियंता सोनटक्के, सोनवणे व अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे व संजय शेंडगे आदींनी शिवाजीनगर परिसराची पाहणी केली. यावेळी आयुक्त भालसिंग यांनी प्रशासनाला ज्या ठिकाणी पाणी असेल, त्या ठिकाणाचे पाणी काढून द्यावेत, अशा सूचना दिल्या असून, परिस्थितीची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे ‘दै. नगर दंवडी’शी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment