भाजपच्या किती प्रभावाखाली राहायचे ते सेनेने ठरवावे : थोरात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 25, 2019

भाजपच्या किती प्रभावाखाली राहायचे ते सेनेने ठरवावे : थोरात

भाजपच्या किती प्रभावाखाली राहायचे ते सेनेने ठरवावे : थोरात

अहमदनगर  ः राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाच्या प्रभावाखाली राहायचे की नाही ? त्यांना किती घाबरायचे? याचा निर्णय शिवसेनेने आधी घ्यावा. आमच्या पक्षाकडे प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ , असे महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. राष्ट्रवादी याला राजी झाल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे थोरातांच्या भूमिकेमुळे  निर्माण झाली आहेत.

सत्ता स्थापन करण्याची काहीही घाई नाही, योग्य वेळी निर्णय घेण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी वेगळीच आघाडी निर्माण होण्याबाबतही तर्क वितर्क केले जात आहेत. याबाबत संगमनेरमध्ये आमदार थोरात यांना छेडले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. शिवसेनेसोबत सत्तास्थापने साठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ , मात्र त्याआधी  शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. भाजपाला घाबरायचे अथवा नाही हे आता सर्वस्वी शिवसेनेने ठरवावे. शिवसेनेचा निर्णय झाल्यास आम्ही आमच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची परवानगी घेऊ  अशीही भूमिका थोरात यांनी मांडली.  दरम्यान अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना आपल्यावर तीन   महिन्यांपूर्वी  राज्याची जबाबदारी काँग्रेसने टाकली, आपण ती पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न केला. राज्यभर वेळ देत असताना प्रथमच या वेळी आपल्या स्वत:च्या संगमनेर मतदारसंघाला वेळ देता आला नाही. मात्र आपली निवडणूक कार्यकर्ते आणि जनतेनेच लढवली. त्यामुळे हा संगमनेरच्या जनतेचा विजय असल्याचेही ते म्हणाले. शिरस्त्याप्रमाणे या वेळी कोणतीही सभा न घेता थोरात तातडीने मुंबईला रवाना झाले

No comments:

Post a Comment