भाजपाचं संख्याबळ घटताच सेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 24, 2019

भाजपाचं संख्याबळ घटताच सेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा?

भाजपाचं संख्याबळ घटताच सेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा?

                                                

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मोजणी सुरू असून, संख्याबळाचं चित्र मात्र स्पष्ट होताना दिसत आहे. सुरूवातीच्या काही फेर्‍यांमध्ये मुसंडी मारलेल्या भाजपाचं संख्याबळ 103 पर्यंत खाली आलं आहे. भाजपाचं संख्याबळ घसरताच शिवसेनेनं सरकारमध्ये फिफ्टी-फिफ्टीचा नारा देत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावरही दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल एकतर्फी लागतील असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. गुरूवारी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या काही फेर्‍यांमध्ये भाजपानं मुंसडी मारली होती. मात्र, प्रत्येक फेरीनंतर भाजपाचं संख्याबळ घटत असल्याचं चित्र आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीपर्यंत भाजपा 103 जागांवर आघाडीवर तर शिवसेना 61 जागांवर आघाडीवर आहे

No comments:

Post a Comment