- Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 18, 2019

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी नगर जिल्ह्यात

अहमदनगर ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी नगर जिल्ह्यात प्रचारसभांसाठी येत आहे. शहा यांच्या अकोले व कर्जत येथे दोन प्रचार सभा होणार आहेत. या दोन्ही सभांसाठी अधिकारी व कर्मचारी असा 788 जणांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
अकोले येथील आयटीआय मैदानावर एक वाजता प्रचारसभा होईल.

त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कर्जत येथील सभेसाठी येणार आहेत. एकाच दिवशी दोन सभा असल्यानेदोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment