- Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 22, 2019

राज्यात युतीला फायदा; आघाडीला फटका
जिल्हयात आघाडीला फायदा;महायुतीला फटका
मुंबई: मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्या जाहीर झाल्या आहेत. या सर्व्हेनुसार यंदा शिवसेनेला सर्वाधिक फायदा होताना दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भाजप, शिवसेनेसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 2014ची निवडणूक स्वबळावर लढली होती. त्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 63, काँग्रेसला 42, राष्ट्रवादीला 41 आणि इतरांना 20 जागा मिळाल्या होत्या. मात्र ताज्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये यंदा भाजपला 146 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिवसेनेला 84, काँग्रेसला 21, राष्ट्रवादीला 27 आणि इतरांना 10 जागा मिळताना दिसत आहेत. या सर्व्हेनुसार भाजपला यंदा 24 जागांचा लाभ होताना दिसत आहे. मात्र, त्यात रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आदी मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे. त्यामुळे तुलनेने भाजपला नुकसान नसले तरी नेत्रदीपक लाभ मिळताना दिसत नाही. त्या तुलनेत शिवसेनेला प्रचंड फायदा होताना दिसत आहे. शिवसेनेला भाजपने जागा वाटपात केवळ 124 जागाच सोडल्या होत्या. कमी जागा पदरात पडून सुद्धा शिवसेना यंदा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. यंदा शिवसेनेच्या खात्यात 84 जागा जाताना दिसत आहेत. शिवसेना 63 जागांवरून थेट 84 जागांवर मुसंडी मारताना दिसत आहे, म्हणजे शिवसेनेला 21 जागांचा फायदा होताना दिसत आहे. शिवसेनेच्या या कामगिरीमुळे त्यांना भाजपला सत्तेत बरोबरीचा वाटा द्यावा लागणार असून त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीपैकी राष्ट्रवादीने प्रचारात चांगली आघाडी घेतली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतल्यामुळे त्याची चर्चाही रंगली होती. मात्र प्रत्यक्षात एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादीला त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. मागच्यावेळी 41 जागांवर विजय मिळवणार्‍या राष्ट्रवादीची घसरण 27 जागांवर होताना दिसत आहे. म्हणजे राष्ट्रवादीला 14 जागांवर फटका बसताना दिसत आहे. तर मागच्यावेळी 42 जागा जिंकणार्‍या काँग्रेसला यंदा फक्त 21 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला यावेळी तब्बल 21 जागांवर फटका बसण्याचा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कामगिरीची तुलना पाहता राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment