शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडीत 0 टक्के मतदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 22, 2019

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडीत 0 टक्के मतदान

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडीत 0 टक्के मतदान 

अहमदनगर  : जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील वडगाव-ढाकणवाडी येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याने या ठिकाणी सोमवारी (दि.21) या मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 0 टक्के मतदान झाले. यामुळे वडगाव-ढाकणवाडी ग्रामस्थांनी पूर्णतः बहिष्कार टाकून एकप्रकारे लोकप्र्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबत राज्य शासन काय भूमिका घेतात, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

वडगाव-ढाकणवाडी येथील ग्रामस्थांनी यापूर्वी नागरी सुविधांमध्ये रस्ता, विजेची सुविधा करून देण्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले.या निषेधार्थच पूर्णतः मतदानावर बहिष्कार टाकून लोकप्रतिनिधींचा निषेध केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे. ही बाब जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाला वडगाव-ढाकणवाडी ग्रामस्थांचे म्हणणे पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
वडगाव-ढाकणवाडी हा भाग पूर्णतः दुर्गम डोंगराळ भागात आहे. या कारणातूनच लोकप्रतिनिधी या परिसराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वडगाव-ढाकणवाडी ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आता राज्य शासन या गावाला न्याय देते की दुर्लक्ष करते, हे दिसणार आहे. त्यामुळे लवकरच राज्य शासनाची भूमिका समजणार आहे. 

No comments:

Post a Comment