..अखेर गांधी -राठोड यांचे मनोमिलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 16, 2019

..अखेर गांधी -राठोड यांचे मनोमिलन

..अखेर गांधी -राठोड यांचे मनोमिलन

शहराला मंत्रीपदासाठी अनिल राठोड आमदार होणे गरजेचे : गांधी

अहमदनगर ः  मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या माजी खासदार दिलीप गांधी यांच्या प्रचारातील सक्रीयतेबद्दलच्या  चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.महायुतीचे उमेदवार अनिल भैय्या राठोड यांनी त्यांची शहरातील भाजप कार्यलयात भेट घेतली आणि तेथेच गांधी यांनी मी प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगितले  
नगर शहर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे समर्थक अलिप्त होते . परंतु महायुतीमध्ये भाजपा शहरात सक्रिय असावा या साठी सेनेकडून प्रयत्न केले गेले . आणि बुधवारी सकाळी भाजपा कार्यालयात खासदार दिलीप गांधी व अनिल भैय्या राठोड यांची भेट झाली .तीन चार दिवसात आपली भूमिका मांडणार असे खासदार गांधी म्हणाले होते. त्यानुसार  त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली . मी पक्षाचा आदेश मानून कार्य करणारा कार्यकर्ता असून शहरात युतीचा उमेदवार जिंकण्यासाठी मी कार्य करील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .  
नगर शहरातील निवडणूक प्रचाराचा आता शेवटचा आठवडा राहिला आहे.  शहर भाजपमधील गांधी व त्यांचे समर्थक मात्र निवडणुकीपासून जवळपास अलिप्त आहेत. त्यामुळे ते सक्रिय होतील, अशी आशा ठेवून दुसरीकडे पर्यायी प्रचार व्यवस्थाही शिवसेनेकडून सुरू केली होती महापालिकेत भाजपचे 14 नगरसेवक आहेत.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजेरी लावली. त्यानंतर ते मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत दिसले.  या पार्श्वभूमीवर महापौर वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांच्यासह अन्य 12 नगरसेवक शहरातील निवडणुकीपासून अलिप्त आहेत. यापैकी बहुतेकांनी आपल्या सोयीनुसार राजकीय भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. युतीच्या प्रचारात मात्र यापैकी कोणीही नसल्याचे दिसत आहे.
असे असले  तरी खा गांधी सक्रिय झाल्याने शहरात युतीची ताकत वाढणार आहे .हे सक्रिय नसणारे नगरसेवक ही सक्रीय होतील आणि शहरात पुन्हा भगवा फडकेल अशी अपेक्षा या वेळी उपस्थित असणार्‍या नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी या मनोमिलनाला शुभेच्छा देताना केली 

No comments:

Post a Comment