भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या युवकांचा चाकूहल्ला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 22, 2019

भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या युवकांचा चाकूहल्ला

 भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या युवकांचा चाकूहल्ला 
रोहित पवार-राम शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी
जामखेड : नगर जिल्ह्यातील बांधखडक (ता. जामखेड) येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत मारामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकूहल्ल्यात दोघे जखमी झाले. संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यात लढत होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बांधखडक येथे सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय 28), हर्षवर्धन शंकर फुंदे (वय 22, रा. दोघे बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. हर्षवर्धन फुंदे याच्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे. भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला झाल्याने चिडलेल्या काही कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारवर दगडफेक केली. या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच काकासाहेब खाडे व इतर अनोळखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment