अहमदनगर मधील घटना; पाण्याची बाटली मागितल्याच्या रागातुन एकाचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 3, 2023

अहमदनगर मधील घटना; पाण्याची बाटली मागितल्याच्या रागातुन एकाचा खून.

 अहमदनगर मधील घटना; पाण्याची बाटली मागितल्याच्या रागातुन एकाचा खून.


श्रीरामपूर -
हॉटेलमध्ये पाण्याची बाटली मागितल्याने त्याचा राग येवून झालेल्या शिवीगाळीनंतर पुढे जाऊन बाटली मागणार्‍यांची मोटारसायकल अडवून त्यांना मारहाण करून एकाला पुलावरून खाली फेकत त्याचा खून करण्याचा प्रकार खिर्डी-टाकळीभान रोडवर घडला.
वांगी शिवारात असणार्‍या हॉटेल कृष्णा येथे कैलास भाऊसाहेब डुकरे, सुरेश म्हसू शिंदे, विजय गंगाराम पवार हे तिघे तिथे थांबले. हॉटेल मालकाची परवानगी घेऊन त्यांनी आणलेला जेवणाचा डबा हॉटेलमध्ये खोलला. जेवण झाल्यानंतर विजय गंगाराम पवार याने बाजूला बसलेल्या विनायक संजय पाळंदे, किशोर संजय गायकवाड यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली. तेव्हा त्यांनी बाटली न देता शिवीगाळ केली व त्यावरून मारामारी झाली. विजय पवार हा त्यांना विरोध करण्यासाठी पुढे गेला तेव्हा त्याला त्यांनी पुलाच्या खाली ढकलून दिले. तेव्हा डुकरे आणि शिंदे हे त्याला वाचविण्यासाठी जात असताना त्यांना पाळंदे आणि गायकवाड मारहाण केली. पुलाखाली जाऊन पडलेल्या विजय पवार चेहन्यावर जोरात दगड मारला. यावेळी त्याच्या चेहन्यातून तसेच डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला. गंभीर जखमी झालेल्या विजय पवार याला टाकळीभान येथे आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून साखर कामगार हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. परंतु, तेथे दाखल करून न घेतल्याने नगर येथील नोबेल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, गुरुवारी सकाळी नोबेल हॉस्पीटल येथे उपचार सुरू असताना विजय पवार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कैलास भाऊसाहेब डुकरे, वय 23, धंदा मजुरी, रा. भोकर याच्या फिर्यादीवरून आरोपी विनायक संजय पाळंदे, किशोर संजय गायकवाड, दोघे रा. खिर्डी, ता. श्रीरामपूर यांच्याविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल बोरसे करीत आहेत.

No comments:

Post a Comment