पैशांसाठी तगादा लावणार्‍या सावकाराविरुध्द खंडणीचा गुन्हा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 3, 2023

पैशांसाठी तगादा लावणार्‍या सावकाराविरुध्द खंडणीचा गुन्हा.

 पैशांसाठी तगादा लावणार्‍या सावकाराविरुध्द खंडणीचा गुन्हा.


पुणे -
दोन लाख रुपयांच्या बदल्यात दोन लाख 40 हजार रूपये परत करूनही एक लाख 80 हजार रूपयांची अवाजवी मागणी करून धमकी देणार्‍याविरुध्द खंडणी विरोधी पथक ने खंडणी आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सूरज शशिकांत म्हेत्रे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील एका व्यक्तीने सूरज म्हेत्रे याच्याकडून 2021 मध्ये दोन लाख रूपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याच्या बदल्यात आरोपीने मुद्दल आणि व्याज असे एकूण दोन लाख 40 हजार रूपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात परत केले होते.
परंतु पैसे परत करूनही सूरज म्हेत्रे याने फिर्यादीला मोबाईलवरून शिवीगाळ केली. तसेच, धनादेश न वटल्यास मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत फिर्यादीने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज केला. या अर्जाची चौकशी करून खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment