घर बांधकामासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 6, 2023

घर बांधकामासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा खून.

 घर बांधकामासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा खून.


नांदेड :
 घराच्या बांधकामासाठी माहेराहून पैसे आणले नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छातीत चाकूचे वार करून खून केला आहे. सदरील घटना भोकर येथे दुपारी बाराच्या सुमारास घडली.
भोकर येथील विवाहिता अश्विनी हिला पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ ही सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होती. माहेराहून बांधकाम करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. या भांडणातच तिच्या छातीत चाकूने वार करून तिला ठार मारले आहे.
याबाबत तिचे वडील राजू नारायण गुंडेकर (वय ४५, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार श्रीराम कराड करत आहेत.

No comments:

Post a Comment