स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नातून कुंभार गल्लीत कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 6, 2023

स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नातून कुंभार गल्लीत कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.

 स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नातून  कुंभार गल्लीत कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.

विकास कामांच्या माध्यमातून प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न - रोहिणी शेंडगे


नगर -
नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी प्रत्येक भागातील विकास कामांना प्राधान्य देत ते पुर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कामांच्या माध्यमातून प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या मुलभुत सुविधांना प्राधान्य देत त्या सोडविल्या जात आहे. शहरातील प्रमुख कामांबरोबर गल्ली-बोळ, कॉलनीतील कामांसाठीही निधी उपलब्ध करुन देत ती पूर्ण केली जात आहे. नगरसेवकांच्या पुढाकाराने नागरिकांची प्रश्न सुटत असल्याचे समाधान आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करणे हे आमचे कर्तव्य आहे. पुढील काळातही नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटीबद्ध राहू. आता स्थायी समितीचे सभापती आपल्या प्रभागातील असल्याने प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लागून, एक आदर्श प्रभाग निर्माण होईल, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.13 मधील कुंभार गल्ली येथील रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सभापती गणेश कवडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, गणेश पिस्का, बाळासाहेब वाकचौरे, नवनाथ झिंजाड, सुधाकर देवतरसे, नाना देवतरसे, भाऊसाहेब देवतरसे, गणेश शिंदे, ललित वाकचौरे, कैलास दळवी, लक्ष्मण सोनवणे, मधुकर दळवी, शिवाजी सुसरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती गणेश कवडे म्हणाले, निवडणुक काळात नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कामांच्या माध्यमातून होत आहे. प्रभागातील नागरिकांना सर्व सुविधा पुरवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य दिले आहे. प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, यापुढे सर्व सुविधांयुक्त विकासित प्रभाग करण्याचा आपला प्रयत्न आहे. सभापती पदाच्या माध्यमातून मोठी विकास कामे प्रभागात निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, शहरातील प्रश्नांसाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मनपाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकास कामातून शहरास वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संतोष गेनप्पा, बाळासाहेब वाकचौरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर देवतरसे यांनी केले तर आभार कैलास दळवी यांनी मानले.

No comments:

Post a Comment